खवड्या डोंगरावरुन आयफोनसाठी उडी मारणाऱ्या कुणालच्या वडिलांबद्दल हैराण करणारी माहिती, थेट..

आयफोन 15 साठी छत्रपती संभाजीनगरच्या कुणाल याने डोंगराहून उडू घेतली. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडीलही डोंगराहून खाली पडले. डोळ्या देखत नवरा आणि मुलगा गेल्यानंतर आईनेही क्षणाचाही विचार न करता उडी घेतली.

खवड्या डोंगरावरुन आयफोनसाठी उडी मारणाऱ्या कुणालच्या वडिलांबद्दल हैराण करणारी माहिती, थेट..
Kunal Chandgude
| Updated on: Aug 22, 2026 | 2:13 PM

पन्नास हजारांच्या एका आयफोनसाठी एक अख्खं कुटूंब संपलं. ही दृश्यं तुम्हाला विचलीत करु शकतात. मात्र, एकीकडे जेनझींच्या आंदोलनानंतर तरुणवर्ग स्वतःबद्दल जागरुक असल्याचं कौतूक होत असताना दुसरीकडे काही मुलं चंगळवादाच्या किती आहारी गेली आहेत, त्याचं हे विदारक चित्र संभाजीनगरमधून समोर आलं. हा कुणाल चांदगुडे वय वर्ष 19 अभ्यासात हुशार… दहावीत 92 टक्के गुण मिळवले… भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं., त्यासाठी तो नीटची
तयारीही करत होता. मात्र भौतिकवस्तूंनी सुखसंपन्न व्हावं ह्या स्वभावापायी त्याच्यासह आई-वडिलांचाही जीव गेला. वडील ट्रकचालक होते आणि आई गृहिणी. घरात भांडून कुणाल कुणाल चांदगुडेने आयफोन घेतला.. वडिल ट्रकचालक असल्यानं कसे-बसे करुन त्यांनी पैशांची जुळवाजुळव केली., मात्र पुढे त्याचेच हफ्ते बाऊन्स झाल्यानंतर पैशांवरुन त्याचा वडिलांशी वाद झाला… खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या पैशांवरूनही अनेकदा त्यांच्यात वाद होत होते.

त्याच रागातून आत्महत्येसाठी कुणाल तिसगावच्या खवल्या डोंगरावर जावून कड्यावर उभं राहिला… स्थानिक लोक त्याला जीवाचं बरं-वाईट करु नको विनवण्या करत होते. काही वेळातच कुणालचे आई-वडिलही तिथं पोहोचले. त्यांनी पोराच्या गयावया सुरु केल्या… मुलगा मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता… तुझे वडिलांसोबत वाद आहेत तर मी वेळ पडली तर त्यांनाही सोडेल, पण तू सोडून जावू नकोस म्हणून आई जीवाच्या आकातानं सांगत होती..

मुलगा डोंगराच्या अत्यंत कडेवर उभा होता… अनेक वेळ समजवूनही तो पुढे येत नसल्यानं अखेर वडील पुढे गेले. त्यांनी मुलाला हात धरुन पुढे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलानंही हात मागे खेचल्यानं तोल जावून मुलगा आणि वडिल दोघांचाही कोसळून मृत्यू झाला…हा सारा प्रकार पाहून प्रत्यक्षदर्शी धक्क्यातून सावरत नाही, तोच अजून एक धक्कादायक घटना घडली. डोळ्यादेखत तरुण मुलगा आणि पतीचाही कोसळून मृत्यू झाल्यानंतर मुलाच्या आईनंही त्याच डोंगरावरुन उडी टाकत स्वतःला संपवून घेतलं.

पन्नास-साठ हजाराच्या एका आयफोनसाठी एक मध्यवर्गीय कुटुंब संपलं…ट्रकचालक असूनही मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहण्यासाठी बाप झटत होता. आई गृहिणी म्हणून घर चालवत होती. पण त्याच फोनच्या हट्टानं अख्खं कुटुंब गिळंकृत केलं…. अपवाद वगळता आत्ताची अनेक मुलं अभ्यासात अत्यंत हुशार आहेत… तरी कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरची जाण मात्र लोप पावत चाललीय…आयफोनच्या हट्टात आंधळ्या झालेल्या मुलाला ट्रकचालक बापाची व्यथा आणि आपल्या आईची घुसमटही दिसू नये., ही शोकांतिका आहे…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us