AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परभणीत संविधानाची विटंबना करणाऱ्या ‘त्या’ आरोपीबाबत धक्कादायक खुलासा, समोर आली महत्त्वाची माहिती

सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे परभणीत वातावरण तापलेलं असतानाच आता संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  

परभणीत संविधानाची विटंबना करणाऱ्या 'त्या' आरोपीबाबत धक्कादायक खुलासा, समोर आली महत्त्वाची माहिती
| Updated on: Dec 24, 2024 | 2:59 PM
Share

परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांकडून आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या प्रकरणात पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं, या आंदोलकांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता, मात्र सोमनाथ सूर्यवंंशी यांचा कोठडीतच मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दरम्यान सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे वातावरण तापलेलं असतानाच आता संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

परभणीतील संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी हा मनोरुग्ण असल्याच समोर आलं होत. आता या आरोपीला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असल्याची माहिती समोर आली आहे.  यासोबतच त्याला अल्कोहोलिक डिसऑर्डर हा आजारही झाल्याचं समोर आलं आहे.  त्याच्यावर अकोल्यातील केळकर हॉस्पिटल या‌ मानसोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तो सप्टेंबर आणि नोव्हेंबर असे दोन महिने केळकर हॉस्पिटलच्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती होता. या मनोरुग्ण आरोपीने परभणीत संविधान शिल्पाची विटंबना केल्यानंतर राज्यभरात आंदोलन पेटलं होतं. दरम्यान आता त्याला असलेल्या आजारांबद्दल केळकर हॉस्पिटलच्या डॉक्टर राधिका केळकर यांनी माहिती दिली आहे.

राहुल गांधींनी घेतली सूर्यवंशी कुटुंबाची भेट 

दरम्यान सोमवारी राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाची परभणीमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले. कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला, व्हिडीओ दाखवले. 99 टक्के नाही तर 100 टक्के ही हत्याच आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमध्ये झाला. सोमनाथ सूर्यवंशी हा दलित असल्यामुळे त्याला मारण्यात आलं असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला होता. तर राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राहुल गांधी हे केवळ द्वेषाचं राजकारण करण्यासाठीच महाराष्ट्रात आले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा