मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींबद्दल धक्कादायक माहिती, थेट जर्मनीच्या..

शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात मोठी माहिती पुढे येत आहे. तिन्ही आरोपींबद्दल आता माहिती पुढे आली. धक्कादायक म्हणजे यातील एक चक्क जर्मनीत कामाला आहे.

मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींबद्दल धक्कादायक माहिती, थेट जर्मनीच्या..
Minister Sanjay Shirsat house
| Updated on: Nov 14, 2026 | 9:35 AM

शिवसेना नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर तीन अज्ञाताकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी सातारा पोलिसांकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली. मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या प्रकरणात आता खळबळ उडवणारी माहिती पुढे आली. संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची पूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घराबाहेर हा प्रकार घडला होता. मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात नवी माहिती समोर आली.

अटक केलेले तिन्ही तरुण उच्चशिक्षित आहेत. एक तरुण जर्मनीतील खासगी कंपनीत नोकरीला देखील आहे. बारमधून बाहेर पडल्यानंतर दुचाकीवरून त्यांनी परिसरात चकरा मारल्या. सुरक्षारक्षकांच्या चौकशीतून वाद वाढल्याची पोलिसांना माहिती आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात अटक केलेल्या तिन्ही तरुणांची पार्श्वभूमी समोर आली आहे.

Loading...

विशेष म्हणजे तिन्ही तरुण उच्चशिक्षित असून यातील रोहित भुताळे हा जर्मनीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. शिवम गायकवाड एम.एस्सीच शिक्षण घेत असून प्रतीक कुटे हा बी. फार्म. पदवीधर आहे.पोलिस चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त हे तिघे मित्र भेटले होते. त्यांनी आधी एन-1 आणि त्यानंतर उल्कानगरी परिसरात मद्यपान केलं.

आणखी दारू मिळवण्यासाठी ते गोलवाडी फाट्यावरील बारमध्ये गेले. बारमधून बाहेर पडल्यानंतर सर्व्हिस रोडवर त्यांची दुचाकी घसरली. त्यानंतर त्यांनी परिसरात दोन ते तीन वेळा चकरा मारल्या. त्यांच्या हालचाली पाहून मंत्री शिरसाट यांच्या सुरक्षारक्षकांनी चौकशी केली. याच चौकशीतून वाद वाढल्याची माहिती तिघांनी पोलिसांना दिल्याचं समोर येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us