AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Rajguru: किर्रर्र अंधार, निर्जन रस्ता; मध्यरात्री रिंकू राजगुरू एकटीच बसमध्ये… थरकाप उडवणारा Video

Rinku Rajguru: सध्या सगळीकडे अभिनेत्री रिंकू राजगुरूची चर्चा सुरु आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू निर्जन रस्त्यावर एकटी फिरताना दिसत आहे. तिच्यासोबत नेमकं काय घडलं? वाचा...

Rinku Rajguru: किर्रर्र अंधार, निर्जन रस्ता; मध्यरात्री रिंकू राजगुरू एकटीच बसमध्ये... थरकाप उडवणारा Video
Rinku RajguruImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 9:20 AM
Share

सैराट या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. पहिल्याच सिनेमातून रिंकू राजगुरूने प्रेक्षकांच्या मनात घर केले. रिंकूच्या प्रत्येक सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. सध्या सोशल मीडियावर रिंकूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये निर्जन रस्त्यावर रिंकू एकटीच दिसत आहे. हा व्हिडीओ रिंकू राजगुरूच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आहे.

रिंकूचा ‘जिजाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये घनदाट जंगल, रात्रीचा गडद अंधार, सुनसान रस्ता, एका बसमधील प्रवास, पोलिसांचा सुरू असलेला तपास आणि रिंकूचे दमदार अॅक्शन सीन्स दिसत आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू पहिल्यांदाच अॅक्शन भूमिकेत दिसत असून तिच्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय, तिच्यासमोर कोणती आव्हानं आहेत आणि या सगळ्यामागे कोणतं गूढ दडलं आहे.

काय असणार चित्रपटाची कथा?

घरातील जबाबदाऱ्या सांभाळत, कुटुंबासाठी धडपडत प्रत्येक स्त्री रोज घराबाहेर पडते. मात्र, या प्रवासात तिच्या सुरक्षेचं, तिच्या अस्तित्वाचं, स्वाभिमानाचं काय? अन्याय सहन करणं हीच तिची नियती असते की, त्याविरोधात उभं राहाण्याची ताकदही तिच्यात असते? एखादी स्त्री जेव्हा अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार करते, तेव्हा तिच्यातील उग्र रूप कसं समोर येऊ शकतं हे ‘जिजाई’ या चित्रपटात दिसणार आहे.

कोणते कलाकार दिसणार?

या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेची कथेत नेमकी काय भूमिका आहे, याबद्दल ट्रेलरमध्ये पुरेशी उत्सुकता कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटातील व्यक्तिरेखांचे परस्परसंबंध आणि कथेतील अनपेक्षित वळणं जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Follow Us
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ