AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यवसायात प्रगती होत नाहीये? नफा वाढवण्यासाठी आज लाभ पंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय!

व्यापाऱ्यांसाठी आजचा (१४ नोव्हेंबर) 'लाभ पंचमी'चा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी काही शुभ कार्ये करणेही अत्यंत फलदायी ठरू शकते. या निमित्ताने तुम्ही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कसा मिळवू शकता, ते जाणून घ्या.

व्यवसायात प्रगती होत नाहीये? नफा वाढवण्यासाठी आज लाभ पंचमीच्या दिवशी करा 'हे' उपाय!
Labh Panchami Upay 2026
| Updated on: Nov 14, 2026 | 9:17 AM
Share

हिंदू धर्मात लाभ पंचमीला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळीनंतर येणारा हा सण व्यापारी आणि उद्योजकांसाठी विशेष मानला जातो. या दिवशी भगवान गणेश, माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांची विधीवत पूजा केल्यास जीवनात सुख-समृद्धी येते आणि व्यवसायात भरभराट होण्याचे नवे मार्ग मोकळे होतात. या वर्षी लाभ पंचमीचा सण १४ नोव्हेंबर २०२६ रोजी साजरा केला जात आहे. या दिवशी पूजेसोबतच काही खास उपाय केल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते.

लाभ पंचमी २०२६: शुभ मुहूर्त

> सकाळची पूजा वेळ: सकाळी ६:५२ ते १०:३३ वाजेपर्यंत

> अभिजित मुहूर्त: सकाळी ११:१२ ते ११:५६ वाजेपर्यंत

> विजय मुहूर्त: दुपारी १:२३ ते २:०७ वाजेपर्यंत

व्यवसायात प्रगतीसाठी कोणते आहेत प्रभावी उपाय?

१. स्वच्छता आणि पावित्र्य: लाभ पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपले घर, देवघर आणि व्यावसायिक ठिकाण अर्थात ऑफिस यांची स्वच्छता करा.

२. त्रिमूर्तीची विशेष पूजा: या दिवशी पूजा स्थळावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून भगवान गणेश, माता लक्ष्मी आणि कुबेर देवाच्या मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा. त्यांना चंदन, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करा. विधीनुसार पूजा केल्याने फक्त व्यवसायात प्रगती होते असे नाही तर कुटुंबात सुख-शांतीसाठी प्रार्थना करा.

३. मंत्र जप: पूजेच्या वेळी माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाच्या मंत्रांचा जप करणे अत्यंत फलदायी ठरेल. यामुळे नकारात्मकता दूर होऊन आर्थिक स्थैर्य लाभते.

४. नवीन वही-खात्यांची सुरुवात: व्यापाऱ्यांसाठी लाभ पंचमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर या दिवशी अनेक व्यापारी आपली दुकाने पुन्हा उघडतात आणि नवीन वही-खाते किंवा नव्या व्यवहारांची सुरुवात करतात. शुभ मुहूर्तावर नवीन कामाची सुरुवात केल्यास व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता वाढते.

५. शुभ-लाभ आणि स्वास्तिक चिन्ह: नवीन वही-खात्यांवर हळद किंवा कुंकू लावून ‘शुभ-लाभ’ आणि ‘श्री’ लिहा. यासोबतच घर आणि दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिकचे चिन्ह बनवा. यामुळे वर्षभर सुख-समृद्धी टिकून राहण्यास मदत होईल.

६. नवीन व्यवसायाचा शुभारंभ: जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखादा नवीन व्यवसाय किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल, तर लाभ पंचमीचा दिवस त्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. या दिवशी नवीन व्यावसायिक करार किंवा कामाची सुरुवात केल्यास यश मिळण्याचे योग बळकट होतात.

(Disclaimer: ही सर्व माहिती धार्मिक मान्यता आणि लोकविश्वासावर आधारित आहे. कोणत्याही कृतीपूर्वी आपल्या विचारांनुसार निर्णय घ्यावा. याची TV9 मराठी पुष्टी करत नाही.)

Follow Us
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ