AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातल्या मोलकरणीचेही नको त्या अवस्थेतील व्हिडीओ, खडसेंच्या जावयाच्या मोबाईलमध्ये काय काय? विशेष तपास पथक करणार चौकशी?

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी करताना पुणे पोलिसांनी रंगेहात पकडले आणि मोठी खळबळ उडाली. आता रूपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून मागवलेल्या अहवालानंतर धक्कादायक खुलासा केलाय. ज्यानंतर राजकिय वर्तुळात खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

घरातल्या मोलकरणीचेही नको त्या अवस्थेतील व्हिडीओ, खडसेंच्या जावयाच्या मोबाईलमध्ये काय काय? विशेष तपास पथक करणार चौकशी?
Pranjal Khewalkar
| Updated on: Aug 08, 2025 | 7:40 AM
Share

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर अनेक आरोप झाली. आता रेव्ह पार्टी प्रकरणात महिला आयोगाने देखील उडी घेतल्याने रोहिणी खडसे चांगल्याच संतापल्या. आता थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केली आहेत. प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं, याचा पाढाचा त्यांनी वाचून दाखवलाय. यानंतर आता चांगलीच खळबळ उडालीये.

पुणे खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात महिला आयोगाने अहवाल मागवला होता आणि तो आता त्यांना देण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे नाथाभाऊंच्या जावयाच्या मोबाईलमध्ये घरातील साफसफाई करणाऱ्या महिलेचे धक्कादायक व्हिडीओ सापडली आहेत. तसा अहवाल पोलिसांकडूनच देण्यात आलाय. फक्त घरातील महिला कामगारच नाही तर अनेक मुलींची फोटो देखील सापडली आहेत.

पुणे पोलिसांनी ज्या रेव्ह पार्टीवर छापेमारी केली, त्या देखील पार्टीतून काही मुलींना ताब्यात घेण्यात आले. घरातील साफसफाई करणाऱ्या महिलेचे काही धक्कादायक व्हिडीओ प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये सापडल्याने खळबळ उडाली असून त्या दोघांचा संबंध नेमका काय? याचा तपास हा केला जाणार आहे. यासोबतच महिलांवरील काही अत्याचाराचे व्हिडीओही मोबाईलमध्ये मिळाली आहेत. प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये 252 व्हिडिओ सापडली आहेत तर 1497 फोटो देखील मिळाली आहेत. परप्रांतीय मुलींना पार्टीत बोलावले जात असल्याचाही खुलासा झालाय.

यापैकी काही फोटो मुलींचे असून ते अश्लील आहेत. या व्हिडीओमधून हे स्पष्ट होतंय की, मुलींना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे दिसत असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. या व्हिडिओचा वापर मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. रूपाली चाकणकर यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालयाचे बघायला मिळतंय. आता यावर रोहिणी खडसे या काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पतीच्या बचावासाठी रोहिणी खडसे या काही दिवसांपासून मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी