केतनचे टक्कल होते म्हणूनच.. सियाचे धक्कादायक पाऊल, थेट लोहगडावरून 400 फूट..
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांनी नुकताच मोठा संशय व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यात अजून काही लोकांचा सहभाग असू शकतो.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची तब्बल 400 फूट खोल दरीत धक्का देऊन हत्या करण्यात आली. ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नाही तर त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने केली. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी मिळून केतनची हत्या केली. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा झाला होता. त्यांचे लग्नही काही दिवसांवर आले होते. मात्र, केतनऐवजी सिया गोयल ही चेतन चाैधरी याच्यावर प्रेम करत. तिने 18 जून रोजी पुण्यातील लोहगडावरून धक्का देत केतन अग्रवाल याची हत्या केली. यापूर्वीही तिच्याकडून केतन याला लोहगडावरून धक्का देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तिला यश मिळाले नाही. सियाने धक्का दिल्यानंतर एका झाडाला केतनने पकडून ठेवले आणि त्यादिवशी तो वाचला.
सुरूवातील सिया हिच्याकडून हा अपघात झाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर पोलिस तपासात काही धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. सिया ज्यापद्धतीने केतनच्या बहिणीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होती तिथेच ती फसली आणि तिच्यावरील संशय अधिक वाढला. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. केतन अग्रवाल याच्यासोबत सिया गोयल हिला लग्न करायचे नव्हते.
कारण केतन अग्रवाल याला टक्कल होते, त्यामुळे तिला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. केतन अग्रवाल विग वापरत असल्याने सियाला खटकत होत, असं सूत्रांकडून सांगण्यात आले. केतन विग वापरत असल्याचे तिला वारंवार खटकत होते. त्यामुळेच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर तिने चेतन चाैधरी याच्यासोबत मिळून केतनची हत्या करण्याचा कट रचला.
केतनची हत्या करण्यापूर्वी ती प्रियकर चेतन चाैधरी याच्यासोबत एका कॅफेत गेली होती. तिथे दोघे काही वेळ बसल्याचे व्हायरल सीसीटीव्हीमधून पुढे येत आहे. या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे. नुकताच केतन अग्रवाल याचे वडील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. लेकाला न्याय मिळून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची त्यांच्याकडून भेट घेतली जात आहे.