AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वांनीच पकडलं डोकं… सियाने सांगितली अशी गोष्ट, अति भयानक… थेट केतन अग्रवाल याच्या…

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आता सिया गोयल पोलिस तपासात सर्व प्लॅनिंग सांगताना दिसत आहे. यादरम्यान सिया गोयल हिने झोप उडवणारा खुलासा केला.

सर्वांनीच पकडलं डोकं... सियाने सांगितली अशी गोष्ट, अति भयानक... थेट केतन अग्रवाल याच्या...
Ketan Agarwal Case
| Updated on: Jun 25, 2026 | 11:08 AM
Share

पुण्याचा केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांनी आपला गुन्हा मान्य केला. यासोबतच त्यांचा किती भयंकर प्लान केतन अग्रवाल याला मारण्यासाठी होता, ते देखील उघड केले. मुख्य आरोपी चेतन चाैधरी हा पोलिस तपासात फिरवा फिरवीची उत्तरे देत आहे. त्याने आपल्यावर कोणत्याही पद्धतीचा संशय येऊ नये, याकरिता आपला मोबाईल फोन घरीच ठेवला होता. आपल्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमार याचा फोन त्याने घेतला होता. काही तास हा फोन त्याच्याकडेच होता. याच फोनच्या माध्यमातून तो सिया गोयल हिच्या संपर्कात होता. केतन अग्रवाल याला धक्का देण्यापूर्वी आणि नंतरही. त्यानंतर त्याने हा फोन नीरजच्या स्वाधीन केला. आपण दिवसभर दुकानातच असल्याचे त्याने भासवले. आता सिया गोयल हिने पोलिस तपात चकावणारी माहिती दिली.

सिया गोयल हिने यापूर्वीही लोहगडावरून केतन अग्रवाल याला ढकलण्याचा प्लान तयार केला. मात्र, तो फसला आणि चेतन अग्रवाल वाचला. त्यानंतर 18 जूनला तिने पुन्हा एकदा केतन अग्रवाल याला लोहगडावर नेले. तिथे सियाने त्याला धक्का दिला आणि तो 400 फूट खोल दरीत कोसळला. जर तो देखील प्लान यशस्वी झाला नसताना तर चेतन आणि सिया यांच्याकडे अपघातात त्याचा जीव घेण्याचा प्लान होता.

जर 18 जूनलाही केतन जिवंत राहिला असता तर अपघाताचा बनाव करत त्याला संपवण्याचा प्लान चेतन आणि सिया यांचा होता. एकीकडे केतन याच्या घरात केतन आणि सिया यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. उदयपूरमध्ये महाल बुल करण्यात आला होता. थेट 2 विमानेही नातेवाईकांना उदयपूरला नेण्यासाठी बुक करण्यात आली होती. कोट्यावधी रूपयांचा पूर्ण महाल बुक होता.

अग्रवाल कुटुंब शाही पद्धतीने आपला लेक केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचे लग्न करण्याची तयारी करत होते. मात्र, सिया आणि तिचा प्रियकर यांचे थेट कोणत्याही परिस्थितीमध्ये चेतन अग्रवाल याला संपवण्याचे ठरले होते. पोलिस तपासात या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अजून काही मोठे खुलासे सिया आणि चेतन करू शकतात.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप