केतन अग्रवाल प्रकरणात पोलिस तपासात धक्कादायक खुलासा, होणारी पत्नीच निघाली दगाबाज, तब्बल 8 जणांवर..

Ketan Agarwal Death : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली. ज्याने एकच खळबळ उडाली. पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात ज्याचा कोणीही विचार केला नाही, तेच पुढे येताना दिसत आहे.

केतन अग्रवाल प्रकरणात पोलिस तपासात धक्कादायक खुलासा, होणारी पत्नीच निघाली दगाबाज, तब्बल 8 जणांवर..
Ketan Agarwal Case
| Updated on: Jun 23, 2026 | 1:38 PM

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या लेकाचे लग्न तोंडावर होते. लग्नाची जोरदार तयारीही सुरू होती. राजस्थानमधील उदयपूर येथे हे लग्न पार पडणार होते. एक आलिशान महाल या लग्नासाठी बुक करण्यात आला होता. नातेवाईकांना विमानाने उदयपूरला नेण्यासाठी दोन विमानेही बुक करण्यात आली. 14 कोटी खर्च करून कुटुंबियांनी आलिशान पद्धतीने लेक केतन अग्रवाल याचे लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून केतन याचे निधन झाल्याची बातमी सर्वांनाच हजर होती. विशेष म्हणजे केतन याची होणारी पत्नी सिया गोयल हिच्या वाढदिवसानिमित्त केतन आणि सिया लोहगडावर गेले. यादरम्यान केतन याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सिया गोयल ही पुण्यातील प्रसिद्ध व्यापाऱ्याची लेक आहे.

सिया आणि केतन यांचे लग्न ठरले होते. या लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, सिया हिच्या मनात काहीतरी वेगळेच होते. तिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. ट्रेकिंगला जाण्याचा बहाना करून सिया केतनला आपल्यासोबत घेऊन गेली. आपल्या काही मित्रांच्या मदतीने तिने थेट केतनला खोल दरीत ढकलून दिले. मात्र, केतन दरीत कोसळल्याचा बनाव तिने केला.

पोलिसांनी संशय आला आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता धक्कादायक सत्य पुढे आले. पोलिसांनी या प्रकरणात आता सिया गोयल हिच्यासोबतच तब्बल 8 जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेने देशभरात एकच मोठी खळबळ उडाली. तपासादरम्यान स्पष्ट झाले की, केतन याची होणारी पत्नी सिया हिनेच तिच्या मित्रांच्या मदतीने केतनला दरीत ढकलले.

या कटात तब्बल 8 जणांचा सहभाग होता. लोणावळा पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. केतनचे वडील विशाल अग्रवाल हे पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध व्यावयायिक आहेत. केतनचा अपघात झाला नाही तर त्याची कट रचून हत्या झाल्याचे कळताच केतनच्या कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगल कोसळला आहे. या प्रकरणात अजून काही धक्कादायक माहिती ही पुढे येऊ शकते.

Follow Us