AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agrawal Case: खळबळजनक अपडेट! लग्नासाठी राजेशाही थाट ठेवणाऱ्या केतनची होणाऱ्या पत्नीने का केली हत्या? कारण तरी काय?

Ketan Agrawal Case: लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या करण्यात आली. त्याची हत्या होणाऱ्या पत्नीनेच केली. पण त्यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

Ketan Agrawal Case: खळबळजनक अपडेट! लग्नासाठी राजेशाही थाट ठेवणाऱ्या केतनची होणाऱ्या पत्नीने का केली हत्या? कारण तरी काय?
केतन अग्रवालImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 23, 2026 | 1:09 PM
Share

लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरुन पडून झालेल्या व्यावसायिक केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रथमदर्शनी अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात पूर्वनियोजित हत्या असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयलने आपल्या मित्राच्या साथीने हा खुनाचा कट रचला आणि लोहगडाच्या दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सियाने हा कट का रचला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

व्यावसायिक कुटुंबातील हा विवाह सोहळा

मृत केतन अग्रवाल हा शहरातील नामवंत व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा पुत्र होता. त्यांचे लग्न मार्केट यार्डातील ज्येष्ठ मसाल्यांचे व्यापारी गोयल कुटुंबातील सिया गोयलशी निश्चित झाला होता. दोन्ही मोठ्या व्यावसायिक परिवारांमधील या लग्नाचा कार्यक्रम जयपूरमध्ये अत्यंत भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आला होता. लग्नासाठी दोन विमानांची बुकिंगही करण्यात आली होती.

हत्येमागचे कारण काय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सिया गोयलला केतन अग्रवालशी लग्न करायचे नव्हते. या विवाहाला विरोध असल्याने तिने आपल्या एका मित्राच्या मदतीने हा भयानक कट आखला. कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन जाण्यात आले. तेथे योग्य वेळ साधून सिया आणि तिच्या मित्राने त्याला खोल दरीत ढकलून दिले. या घटनेत केतनचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचे समजले जात होते. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी केल्यानंतर हा प्रकार हत्या असल्याचे स्पष्ट झाले. या हायप्रोफाइल खुनाच्या प्रकरणाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिक विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस दोन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तपासात नेमकं काय आलं समोर?

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांना थोडा संशय आला. त्यांना तापासात अनेक त्रुटी आढळल्या. त्याना सियावर संशय येऊ लागला. पोलिसांनी तांत्रिक तपासाचा देखील आधार घेतला. दरम्यान, पोलिसांनी लोहगडावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा एका तरूणाच्या हालचालींवरुन त्यांचा संशय वाढला. भर उन्हात या तरुणाने हुडी घातले होते आणि कानानत हेडफोन असल्यामुळे पोलिसांना संशय आला. सखेल तपास केल्यानंतर अखेर सत्य समोर आले.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!