समृद्धी महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ, भरदिवसा थैमान, टायर फोडून लुटमार, तब्बल..

समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. सतत लुटमारीचे प्रकार घडताना दिसत आहेत. समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात (चॅनेल क्र. 542.1) गुरुवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास दरोड्याची थरारक घटना घडली.

समृद्धी महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ, भरदिवसा थैमान, टायर फोडून लुटमार, तब्बल..
Samruddhi Mahamarg
| Updated on: Aug 29, 2026 | 1:37 PM

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, साहिल सतीश सोनवणे (वय 22) हे 26 ऑगस्ट रोजी नागपूरहून मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. दुपारी सुमारे 4.10 वाजता मुंबई कॉरिडॉरमधील एक्सिट क्रमांक 18 जवळील टोलनाक्याच्या परिसरात त्यांची गाडी थांबवण्यात आली. यावेळी एका सेल्टोस गाडीने त्यांची गाडी अडवली, तर एका एक्सयूव्ही 700 मधून काही जण खाली उतरले. तक्रारीनुसार, चार जणांनी सोनवणे यांच्या गाडीच्या दिशेने येत त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. या झटापटीत सोन्याची चेन तुटून आरोपी ती घेऊन पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. हिसकावून नेलेल्या सोन्याच्या चेनची किंमत सुमारे 1 लाख 50 हजार रुपये असल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

चेनमध्ये दोन तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोने असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर तक्रारदाराने वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सुरुवातीला घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जाण्यास वेळ लागल्याने तक्रार नोंदवण्यास विलंब झाल्याचेही एफआयआरमध्ये नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 310(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सिन्नर, समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लुटण्याचा टोळीचा प्रयत्न, हवेत गोळीबार झाल्याने लुटारू पसार झाले. दरोडेखोरांनी रस्त्यावर खिळे व धारदार वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर केले आणि प्रवाशांवर दगडफेक करत लुटमार केली. एकाच वेळी घडलेल्या या तीन थरारक घटनांमुळे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर बनला आहे.

समृद्धी महामार्गावरील मुंबई व नागपूर कॉरिडॉरवर (चॅनेल क्र. 538 ते 543) दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत एकाच वेळी तीन गाड्यांना टार्गेट केले. रस्त्यावर धारदार वस्तू व खिळे फेकून लुटारूंनी श्रीकांत मिश्रा, पांडुरंग माने आणि मोहम्मद फरान यांच्या वाहनांचे टायर पंक्चर केले. वाहने थांबताच 10 अज्ञात भामट्यांनी दगडफेक करत मिश्रा व माने यांच्याकडील मौल्यवान ऐवज बळजबरीने लुटला. तर अरिहन लानी यांनी गाडी न थांबवता पळ काढून स्वतःचा बचाव केला.

दरम्यान मोहम्मद फरान यांची गाडी पंक्चर करून लुटारू जवळ येत असताना त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्टलने हवेत दोन राऊंड गोळीबार केला. गोळीबार आणि त्याचवेळी महामार्ग पोलीस व वावी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने लुटारूंनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. घटनास्थळी सिन्नर महामार्ग पोलीस, वावी पोलीस ठाणे आणि QRV पथकाने पोहोचून बाधित प्रवाशांना तात्काळ मदत केली. महामार्गावर 24 तास गस्त वाढवण्यात आली असून लुटारूंचा शोध सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात (चॅनेल क्र. 542.1) गुरुवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास दरोड्याची थरारक घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या चाकांसमोर अज्ञात दरोडेखोरांनी लोखंडी वस्तू फेकून गाड्या थांबवल्या. गाडी थांबताच 30 ते 35 वयोगटातील 11 ते 12 हिंदी भाषिक दरोडेखोरांनी वाहनांना गराडा घातला.

दरोडेखोरांनी प्रवाशांना लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करत त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे आणि रोख रक्कम असा एकूण 18 लाख 9 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. छत्रपती संभाजीनगर येथील वकील श्रीकांत राजेंद्रप्रसाद मिश्रा (वय 37) यांच्या फिर्यादीवरून सिन्नर समृद्धी महामार्गावर दरोडा प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 310(2) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास वावी पोलिस करत आहेत.

Follow Us