AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडच्या समर्थकाचा तो व्हिडीओ व्हायरल, बीडमध्ये मोठी खळबळ..

विलास घुले प्रकरणात सतत बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलाचे नाव येत आहे. त्यातच आता बजरंग सोनवणे यांनीही आरोप केले. बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड यांच्यासह थेट धनंजय मुंढे यांच्यावर आरोप केले. त्यातच आता व्हिडीओही व्हायरल होतोय.

वाल्मिक कराडच्या समर्थकाचा तो व्हिडीओ व्हायरल, बीडमध्ये मोठी खळबळ..
Valmik Karad
| Updated on: Oct 03, 2026 | 1:47 PM
Share

संतोष देशमुख प्रकरणानंतर आता बीडमध्ये विलास घुले प्रकरणानेही खळबळ उडाली आहे. विलास घुले प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. दोन गटात सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले नावाच्या तरुणाला संपले. या प्रकरणात सतत खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव येत आहे. घटनेच्या काही महिन्यांनी आमदार धनंजय मुंडे यांनी विलास घुले याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. बजरंग सोनवणे यांनी एका गंभीर आरोपाने खळबळ उडाली आहे. बीडमधील जेलमध्ये वाल्मिक कराडकडून मोबाईलचा वापर केला जातो, असा गंभीर आरोप खासदार सोनवणे यांनी केला आहे. यासोबत मुद्दाम या केसमध्ये गुंतवले जात असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यातच आता वाल्मिक कराडच्या साथीदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने एकच खळबळ उडाली. बीड वाल्मिक कराडचा साथीदार सुग्रीव कराडची गुंडगिरी बघायला मिळाली. माणसा सकट एका तासात सगळं जाळण्याची धमकी दिल्याचे दिसतंय. मस्साजोगच्या देशमुख नामक तरुणाला उमरी टोल नाक्यावर धमकी देण्यात आली.

कराडने टोल‌ न भरल्याने वाद झाल्याची माहिती मिळतंय. धक्कादायक व्हिडिओ समोर आला. मात्र, हा व्हिडीओ आताचा नाही तर काही दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती मिळतंय. याच टोलनाक्यावरून कराड टोळीने संतोष देशमुखांचे अपहरण केले होते. पुढे त्यांच्यासोबत काय झाले हे राज्याने बघितले.

यानंतर याच टोलनाक्यावर कराडच्या साथीदाराने मस्साजोग गावातील एका देशमुख नामक तरुणावर हल्ला केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याच सुग्रीव कराड आणि वाल्मिक कराडची तीन दिवसांपूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, ज्यामध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाला गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचे समोर आले होते. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. साैरभ सोनवणे याचे नाव विलास घुले प्रकरणात येत आहे. मात्र, बजरंग सोनवणे यांनी सर्व आरोप खोडून काढले.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका