Shrikant Shinde: राज्यात दुष्काळ; एकनाथ शिंदेंच्या मुलाने घेतला मोठा निर्णय, काय म्हणाले?

Shrikant Shinde News: महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याने डोंबिवलीतील लोकप्रिय रासरंग दांडिया उत्सव यंदा रद्द करण्याचा श्रीकांत शिंदेंनी निर्णय घेतला आहे.

Shrikant Shinde: राज्यात दुष्काळ; एकनाथ शिंदेंच्या मुलाने घेतला मोठा निर्णय, काय म्हणाले?
| Updated on: Sep 24, 2026 | 6:20 PM

महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. एल निनोमुळे कमी झालेल्या पावसामुळे पाण्याची टंचाई अधिकच गंभीर झाली आहे. याचा परिणाम केवळ खरीप पिकांवरच नाही, तर रबी पिकांवरही झाला आहे. यावर आता महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरवर्षी दांडिया उत्सवासाठी होणारा खर्च यंदा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

डोंबिवलीतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांत शेतीचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट लक्षात घेऊन उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवासाठी होणारा निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवण्यात येणार आहे. कोणत्या भागात आणि कोणत्या स्वरूपात मदत द्यायची याचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाची परंपरा मात्र कायम ठेवत देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना साधेपणाने केली जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. शेतकरी आर्थिक संकटात असल्याने दांडियाचा निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी शरद पवार यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी राज्यात अधिकृत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चिंताजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियमांनुसार, खरीप हंगामासाठी दुष्काळ जाहीर करण्यासाठीचे मूल्यांकन ५ ऑक्टोबरनंतरच सुरू होऊ शकते, जेव्हा मान्सून परतीचा प्रवास सुरू होतो. रबी हंगामासाठी हे मूल्यांकन मार्च २०२७ मध्ये केले जाऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us