
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपाची दमदार कामगिरी राहिली. भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. भारतीय जनता पार्टीने काही महापालिकांवर एकहाती सत्ता आणली. शिवसेना शिंदे गटाने आणि भाजपाने युती करून मुंबई महापालिका निवडणूक लढवली. विशेष म्हणजे भाजपाचे 89 आणि शिवसेना शिंदे गटाचे 29 उमेदवार निवडून आले. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट मिळून मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील. मात्र, त्यापूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत. महापाैर भाजपाच होणार असल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यानच एकनाथ शिंदे यांनी मोठी अट ठेवल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना अडीच वर्ष आणि भाजपा अडीच वर्ष असे महापाैरपद द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जात आहे. याचपार्श्वभमूीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले.
आता नुकताच हैराण करणारा खुलासा झाला असून मोठा दावा करण्यात आला.’द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ मधील माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. हैराण करणारे म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाने थेट उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केला आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात काहीच नसल्याचे सांगितले.
आजही आम्हाला त्यांना मानतो असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, जर देवाची इच्छा असेल तर महापाैर हा आमचाच होईल. उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये हे विधान केल्याचे कळतंय. कारण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले, यासोबतच भाजपालाही हवे तेवढे संख्याबळ नाही.
शिवाय दुसरीकडे मुंबईचा महापाैर आमच्या पक्षाचा व्हावा, ही इच्छा कालही होती आणि आजही आहे, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले. यामुळे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवकांवर बारीक लक्ष आहे. यासोबतच अडीच वर्ष महापाैर आमच्या पदाचा याकरिताही एकनाथ शिंदे आग्रही आहेत. दोन ते तीन दिवसात एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय ते स्पष्ट होईल.