
छत्रपती संभाजीनगर | 16 सप्टेंबर 2023 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आजपासून पुढचे दोन दिवस राज्य मंत्रिमंडळील मंत्री आणि अधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील. या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठावाड्यापाठोपाठ कोकणातही मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणातही मंत्रिमंडळ बैठकीची मागणी करण्यात येत आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ही मागणी केली आहे. मराठवाड्यात आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. मराठवाड्याप्रमाणे कोकणात ही मंत्रिमंडळीची बैठक व्हावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोलताना आजच्या या बैठकीवर टीका केली. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. आज महाराष्ट्र सरकारची मराठवाड्यात कॅबिनेट मिटिंग होत आहे. मराठावाड्याला भरभरून देण्याचं काम आमचं सरकार करेल. या सगळ्या गोष्टींवर पणवती लावण्याचं काम ठाकरे गट करत आहे. हॉटेल व्यवसायिकांच भल होतंय. हे यांना बघवत नाही. म्हणून बैठकीच्या खर्चावर हे बोलत आहेत. संजय राऊतचा मालक आणि मुलगा यांनी केलेला खर्च नेमका कोणाचा होता?, असा सवाल विचारत नितेश राणे यांनी संजय राऊतांना उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना हे लोक सरकारच्या पैशावर जगले. आता आमचं सरकार मराठवाड्यासाठी काही निर्णय घेत आहे. मराठवाड्यासाठी काही करू पाहात आहे. तर हे लोक काळ्या मांजरीसारखे आडवे येत आहेत, असं म्हणत नितेश राणे यांनी मविआ आणि विशेषत: खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
इच्छा असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला जाणार आहे. त्यांना प्रश्न विचारणार आहे. त्याला उत्तर देताना मी पण आमच्या संपादकाला घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला जाणार आहे, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला जाऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार मला देखील आहे. मग त्यांनी थयथयाट करायचा नाही. गणेशोत्सव काळात चिपी विमानसेवा विस्कळीत झालेली अशी घटना घडू नये म्हणून आम्ही प्रयत्न करू. शिवसेनेचा धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे यांच्याजवळच राहील. शिवसेना नाव कायम एकनाथ शिंदेंसोबत राहील, असं नितेश राणे म्हणाले.