AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच होण्याची शक्यता

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशातच आता कोकणातील मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. 'या' मतदार संघात भाजप विरूद्ध शिंदे गट रस्सीखेच होणार? कोणता आहे हा मतदारसंघ? वाचा सविस्तर..

'या' मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच होण्याची शक्यता
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 01, 2024 | 1:12 PM
Share

विनायक डावरूंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग | 01 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर ठेपली आहे. अशातच आता युती आणि आघाडीचं जागावाटप कधी होणार याची सर्वत्र चर्चा होतेय. अशातच काही जागांवर तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कोकणातल्या मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळू शकते. कोकणातील दोन मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना दोन्ही गट दावा करण्याची शक्यता आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे कोकणातील मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात रस्सीखेच होणार?

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या भाजप तयारीत असल्याची माहिती आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते किरण सामंत निवडणूक लढण्याची शक्यता असतानाच भाजपकडून या मतदारसंघासाठी तयारी सुरु असल्याची माहिती आहे. त्.ामुळे

भाजपकडून ‘या’ मंत्र्याला तयारीला लागण्याचे आदेश?

शिवसेना या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. अशातच आता असतानाच भाजपकडून रवींद्र चव्हाण हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा होतेय. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी चव्हाण यांच्या नावाची चर्चा होतेय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांनी दिल्याचीही माहिती आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

‘या’ मतदारसंघावर भाजपचा डोळा?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेत आहे. ‘मी किरण रवींद्र सामंत… रोकेगा कोण?’ असं स्टेटस किरण सामंत यांनी ठेवलं आहे. अशातच भाजपकडून मात्र रविद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याच्या सूचना आल्याची माहिती आहे. भाजप कडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होतेय. भाजपने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची मागणी केल्यामुळे शिंदे गट आक्रमक झाल्याची माहिती आहे.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन