
नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 506 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 679 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 25, बागलाण 7, चांदवड 25, देवळा 16, दिंडोरी 15, इगतपुरी 5, कळवण 4, मालेगाव 2, नांदगाव 5, निफाड 125, सिन्नर 87, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 1, येवला 35 अशा एकूण 353 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 235, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 32 रुग्ण असून असे एकूण 630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 815 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे 97.10 टक्के, नाशिक शहरात 98.17 टक्के, मालेगावमध्ये 97.10 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.73 इतके आहे. नाशिक ग्रामीण 4 हजार 197 नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 3 हजार 998 मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या कॉलेजमध्ये आजपासून 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मंत्री उदय सामंत यांनी तशा सूचना दिल्या आहेत. नाशिकमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. विशेषतः सिन्नर, निफाड आणि येवला हे हॉटस्पॉट झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिक शहरातील महाविद्यालयांमध्ये 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लस घ्यायला लावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने ही तयारी केली आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेतलेले पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही दिलासा मिळणार आहे.
एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांकडून देण्यात आली.
इतर बातम्याः
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जळगावमध्ये 12 अंश सेल्सियस नीचांकी तापमानाची नोंद
शेतकऱ्यांना दिलासा; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 नव्हे फक्त 3 दिवस बंद
Photo : इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचा एल्गार; पुणे, डोंबविली, सोलापूरसह राज्यभरात सायकल रॅली https://t.co/WnadQuPHsg @ShivSena @AUThackeray @OfficeofUT @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis #FuelPriceHike #PetrolDieselPriceHike #PetrolPrice #DieselPrice #YuvaSenaProtest #YuvaSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2021