AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : अखेर पाकिस्तानला झुकवलं, वर्ल्ड कप सामन्यावरुन PCB ची मोठी पलटी

T20 World Cup 2026 : इंटरनॅशनल क्रिकेट काऊंन्सिलचे रिप्रेजेंटेटिव इमरान ख्वाजा आणि मुबाशिर उस्मानी अलीकडेच लाहोरला आले होते. तिथे त्यांनी पीसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ही बैठक पीसीबीकडून आयोजित करण्यात आली होती.

T20 World Cup 2026 : अखेर पाकिस्तानला झुकवलं, वर्ल्ड कप सामन्यावरुन PCB ची मोठी पलटी
IND vs PAK
| Updated on: Feb 10, 2026 | 8:54 AM
Share

IND vs PAK Match T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळणार नाही, असं जाहीर करुन एकच खळबळ उडवून दिली होती. पण आता त्याच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या त्या निर्णयावरुन पलटी मारली आहे. पीसीबीने हा निर्णय पाकिस्तान सरकारच्या आदेशावरुन घेतला होता. पण आता आयसीसीसोबत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या निर्णयावरुन माघार घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पलटी मारली आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात ग्रुप मॅच होणार आहे. 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये हा सामना होणार आहे.

इंटरनॅशनल क्रिकेट काऊंन्सिलचे रिप्रेजेंटेटिव इमरान ख्वाजा आणि मुबाशिर उस्मानी अलीकडेच लाहोरला आले होते. तिथे त्यांनी पीसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ही बैठक पीसीबीकडून आयोजित करण्यात आली होती. मीटिंगमध्ये बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल सुद्धा सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. कारण हा सगळा वाद बांग्लादेश न खेळण्यावरुन झाला होता. आयसीसीकडून पाकिस्तानला मॅच न खेळल्यास संभाव्य फायनान्शिअल पेनल्टी आणि अन्य परिणामांची माहिती दिली. त्यानंतर पीसीबीची भूमिका बदलली.

कोणी-कोणी पाकिस्तानला विनंती केली?

भारत-पाकिस्तान हा क्रिकेटमधील सर्वात मोठा आणि रोमांचक सामना मानला जातो.पीसीबीच्या बदलेल्या भूमिकेमुळे क्रिकेट प्रेमींमध्ये निश्चित आनंदाची भावना आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना आता शेड्यूलनुसार होईल.भारत-पाकिस्तान सामना झाला नसता, तर प्रायोजकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं असतं. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सुद्धा हा सामना खेळण्याची पाकिस्तानला विनंती केली होती.

पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर पोस्टमध्ये काय म्हटलं?

पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर एक पोस्ट करुन भारताविरुद्ध मॅच खेळणार असल्याची घोषणा केली. मित्र देशांसोबत झालेली चर्चा लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने पाकिस्तान नॅशनल क्रिकेट टीमला 15 फेब्रुवारीला होणार्‍या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप सामन्यासाठी मैदानात उतरण्याचे निर्देश दिले आहेत. आयसीसीसह तीन क्रिकेट बोर्डांनी पाकिस्तानला भारताविरुद्ध मॅच खेळण्याचं आवाहन केलं. यात श्रीलंकन क्रिकेट बोर्ड, अमीरात क्रिकेट बोर्ड आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड होतं.

Follow Us
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी