ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत अख्खं कुटुंबच संपलं, तीन बालकांसह सहा जणांचा मृत्यू

एका भरधाव ट्रकने ठोकरल्याने दुचाकीचा चक्काचूर झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी जवळ घडली आहे. मृतात तीन बालकांचा समावेश आहे.

ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत अख्खं कुटुंबच संपलं, तीन बालकांसह सहा जणांचा मृत्यू
jalgaon accident news
| Updated on: Oct 15, 2026 | 11:36 PM

एका भरधाव ट्रकने ठोकरल्याने दुचाकीचा चक्काचूर झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी जवळ घडली आहे. मृतात तीन बालकांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मालदाभाडीजवळ भीषण अपघात घडला आहे. येथे एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दूचाकीवर बसलेले सहा जणांचे कुटुंब जबर जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

या तीन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या अपघातात ठार झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील लोक आहेत. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एक संपूर्ण कुटुंबच नष्ट झाले आहे. हे कुटुंब मध्य प्रदेशातील बराणपूर येथील रहिवासी आहे. जामनेर तालुक्यातील माल दाभाडी गावाजवळ ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख पटली असून ते मध्य प्रदेशातील रहिवासी असून जामनेर तालुक्यात कामानिमित्ताने राहत होते.

Loading...

मृतांची नावे काय ?

रामा सुरसिंग भिलाले ( वय 26 वर्ष ), सिमला रामा भिलाले ( वय 22 वर्ष ), पूजा रामा भिलाले ( वय 5 वर्ष ),भारती रामा भिलाले (वय 3 वर्ष ),श्रावण रामा भिलाले ( वय 3 महिने ),चंपालाल रेवलसिंग भिलाले (वय 28 वर्ष ) अशी मृतांची नावे आहेत. मयत व्यक्ती एकाच कुटुंबातील असून आई-वडील तसेच तीन चिमुकले तर एका नातलगाचा मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे माहिती दिली.

बहीण , भाऊ तसेच मेहुणे , तीन मुले सहा जणांचा बळी

जळगावच्या जामनेर जवळ ट्रक आणि दुचाकी अपघातात मृत्यू पावलेले कुटुंब जामनेर तालुक्यातील पोखर तांडा या गावी उदरनिर्वाहासाठी शेतमजूर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. कुटुंब त्यांच्या गावावरून परत कामाच्या ठिकाणी येत असताना जामनेर जवळच कुटुंबावर  काळाने झडप घातली.  मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत केली आहे.  सर्व मृतदेहांवर शवविच्छेदन करून उद्या सकाळी सर्व मृतदेह स्वतंत्र गाडीने गावी पोहोचवले जाणार आहेत. अपघातात मयत दुचाकीस्वार चंपालाल यांची बहीण , भाऊ तसेच मेव्हणे , तीन मुले अशा सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us