Ketan Agarwal Murder Case : साखरपुड्यापासून ते हत्येपर्यंत… केतन अग्रवाल प्रकरणात कधी काय काय घडलं?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने देशाला हादरवून सोडले आहे. होणाऱ्या पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. साखरपुड्यापासून ते हत्येपर्यंत घडलेल्या धक्कादायक घटनांचा क्रम या लेखात आहे. बाली प्रवास रद्द होण्यापासून ते लोहगड किल्ल्यावरील प्रयत्नांपर्यंत, कसा रचला गेला हा कट, हे सविस्तरपणे मांडले आहे.

Ketan Agarwal Murder Case : साखरपुड्यापासून ते हत्येपर्यंत... केतन अग्रवाल प्रकरणात कधी काय काय घडलं?
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने अख्खा देश हादरला
| Updated on: Jun 25, 2026 | 7:36 AM

सध्या देशभरात केतन हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. होणाऱ्या पत्नीनेच आपल्या भावी नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वच हादरून गेले आहेत. लग्न करायचं नव्हतं तर लग्न मोडायचं होतं, एखाद्याचा जीव कशाला घ्यायचा? अशा प्रतिक्रिया आता उमटत आहे. सिया गोयल या तरुणीचं चेतन चौधरी नावाच्या तरुणावर प्रेम होतं. पण तिचं लग्न केतन अग्रवालसोबत ठरलं. हे लग्न होऊ नये म्हणून सियाचा खटाटोप होता. पळून गेल्याने घरच्यांची बदनामी होईल. त्यामुळे तिने आणि तिच्या प्रियकराने केतनचाच काटा काढण्याचं ठरवलं आणि एक भयंकर हत्याकांड घडलं.

या प्रकरणात कधी काय काय घडलं? यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप…

>> फेब्रुवारी 2026 मध्ये केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा पुण्यात मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला.

>> 31 मे 2026 रोजी केतन आणि सिया प्रथमच लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले होते.

>> याच दिवशी सियाने तिचा प्रियकर चेतन याची भेट घेतली आणि केतनच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

>> 4 जून रोजी सियाने पुन्हा केतनसोबत लोहगडला जाण्याचा हट्ट धरला होता.

>> केतन आणि त्याची बहीण तसेच सिया आणि तिचा भाऊ मुंबई विमानतळाकडे रवाना झाले होते. तेथून त्यांना बालीला जाण्याचे नियोजन होते.

>> वृत्तांनुसार, केतनने प्री-वेडिंग पार्टी आणि सियाचा वाढदिवस बालीमध्ये साजरा करण्याचा बेत आखला होता.

>> मात्र, मुंबईला जात असताना केतनचा पासपोर्ट हरवला.

>> तपासात असा दावा करण्यात आला की, सियानेच पासपोर्ट चोरून हॉटेलच्या स्वच्छतागृहात फ्लश केला होता.

>> त्यामुळे सर्वांना बालीचा प्रवास रद्द करावा लागला.

>> 14 जून रोजी सिया पुन्हा केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर गेली.

>> या दिवशी सियाने केतनला ढकलल्याचा आरोप आहे. मात्र केतनने झाडाचा आधार घेतल्याने तो बचावला.

>> नंतर सियाने जवळ साप असल्यामुळे तिने केतनला ढकलल्याचे कारण दिले.

>> 18 जून रोजी सियाने पुन्हा केतनला लोहगडला जाण्याचा हट्ट धरला.

>> 19 जून रोजी सियाचा वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने ती केतनला तेथे घेऊन गेल्याचा आरोप आहे.

>> केतनच्या वडिलांनी विरोध केल्यानंतर सियाने केतनच्या आईला व्हिडिओ कॉल करून आग्रह धरला.

>> त्यानंतर केतनच्या कुटुंबीयांनी या सहलीला परवानगी दिली.

>> 19 जून रोजी सियाच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरमधील एका मोठ्या रिसॉर्टमध्ये पार्टीचे नियोजन केतनच्या कुटुंबीयांनी केले होते.

>> 18 जून रोजीच सियाचा प्रियकर चेतन चौधरी दुचाकीवरून लोहगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गेला होता.

>> केतन आणि सिया किल्ल्यावर चढत असताना चेतन त्यांच्यापुढे किंवा मागे चालत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आला आहे.

>> त्यानंतर पूर्वनियोजित कटानुसार सियाने तिच्या प्रियकराची भेट घेतली आणि 18 जून रोजी केतनची हत्या केल्याचा आरोप तपासात करण्यात आला आहे.

Follow Us