
नुकताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल अत्यंत मोठं विधान केलंय. दमानिया यांनी म्हटलं की, धनंजय मुंडेंचं दहशतीचे राजकारण आता संपलंय. असं ट्विट मी काल केलं आणि त्याचं कारण असं की बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना तिथे धनंजय मुंडे कुठेही दिसले नाही हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा भाषणात अजित पवार म्हणतात की, इथे कोणाचे बड्या बापाचा बेटा असला तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होईल.
तिसरा डायलॉग त्यांचा की, आका असो काका असो सगळ्यांवर कारवाई होईल.
एकदा माफ केलं जाईल, दोनदा केलं जाईल तिसऱ्या चौथ्यांदा जर झालं तर चौथ्यांदा थेट त्यांच्यावर मकोका घालावा ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजाभाऊ मुंडे नावाच्या व्यक्तीला जे अजित पवार गटात घेतलं गेलं याचा अर्थ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कुटुंबाचं राजकारण आता संपलं, असे थेट मोठे विधान अंजली दमानिया यांनी केले आहे.
पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, आता वंजारी समाजाला जवळ ठेवण्यासाठी राजाभाऊ मुंडे ना घेतले गेले, पण या सगळ्या बोलण्यावरून आपल्याला दिसतंय की आता धनंजय मुंडे यांना कुठेही धारा मिळणार नाही आणि म्हणून मी आज सकाळी बघितले. सात वाजल्यापासून बातमी चालतीये की, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग मिळाला नाही ही बातमी आली कुठून ते स्पष्टपणे अजित पवार धनंजय मुंडेंना बाजूला करतात म्हणूनच धनंजय मुंडेनी थेट कार्यकर्त्यांद्वारे ही पेरली आहे असं माझं स्पष्ट मत आहे.
सगळ्यांच्या डोक्यात धनंजय मुंडे संपला ही गोष्ट गेली नाही पाहिजे म्हणून ही बातमी पेरण्यात आली आहे असं माझं क्लिअर कट म्हणणं आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना दमानिया म्हणाल्या की, जनभावनामुळे घेतला गेला याच्यात काहीच दुमत नाही. कारण संतोष देशमुख यांचे जेव्हा फोटो बाहेर आले त्याच्यातली क्रुरता बाहेर आली आणि तो कृतांत करणारा कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा होता म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला गेला. वरून दबाव होता की नव्हता त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जनभावना जी होती ती ही होती आणि त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला गेला.
राहुल गांधींच्या डोक्याची चिप खराब झाली आहे, मला असं वाटतंय की आत्ताच्या घडीला लोकशाहीची चीप आहे ते बरोबर झाली आहे आणि कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेपासून हे स्पष्टपणे दिसते त्यांनी जी जी उदाहरण दिली म्हणजे घर नंबर झिरो असलेल्या असंख्य मतदार म्हणजे घराचा पत्ताच मुळाची शून्य आहे असे मतदान मग एका रूममध्ये 80 मतदार आणि ते पण वेगवेगळ्या कुटुंबातले वेगवेगळ्या नावांचे लोकं हे जे दाखवले गेले एका घरात 46 लोक दाखवले गेले. मला कळत नाहीये की, ही मतदार यादी इतकी होरेबल कशी असू शकेल एवढंच नाही एक मतदार त्यांनी चार वेगवेगळ्या पोलिंग भूतमध्ये मतदान करतोय एक मतदार कर्नाटक युपी आणि महाराष्ट्रात करतोय हे अनेक जे त्यांनी खुलासे केले, असं वाटतं यांच्यावर सुप्रीम कोर्ट नक्कीच कारवाई करेल.
महाराष्ट्रातल्या एक कोटी मत वाढीवर बोलताना दमानिया म्हणाल्या की, सगळे बाहेर आल्या एवढेच नाही जे सगळे सीसीटीव्ही कव्हरेज होतं जे पाच वाजल्यानंतर जे प्रचंड मतदान झालं त्याची जी संख्या वाढली एक कोटी मतदार जे वाढलेत जर हिम्मत असेल आणि ही जर मतदार यादी पूर्णच्या पूर्ण मिळाली याच्यात अनेक खुलासे होतील, मला असं वाटतं याचा आता सुप्रीम कोर्टाकडून निर्णय घेतला गेला पाहिजे. जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानाबद्दलही बोलताना दमानिया या दिसल्या.