अंजली दमानिया यांची थेट सरकारवर टीका, म्हणाल्या, अर्थमंत्री दहावी पास..

अंजली दमानिया यांनी नुकताच मोठी टीका केली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक प्रकरणावर थेट भाष्य केले. त्या म्हणाल्या की, गलिच्छ पद्धतीने होत आहेत सगळ्या गोष्टी. महाराष्ट्राचे पोलिस खरंच काही काम करत आहेत का? हा प्रश्न उपस्थित होतो. 

अंजली दमानिया यांची थेट सरकारवर टीका, म्हणाल्या, अर्थमंत्री दहावी पास..
Anjali Damania
| Updated on: Oct 12, 2025 | 11:42 AM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकताच राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर भाष्य केले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. अंजली दमानिया यांनी म्हटले की, 12 ऑक्टोबरला आरटीआय कायदा आपल्या देशात आला. आरटीआय कायद्याला फारसे कोणी महत्व देत नाहीत. खरी लोकशाही हवी असेल तर माहितीचा अधिकार सगळ्यांना हवा. हा कायदा पूर्ववत करण्यात आला पाहिजे. यासोबतच त्यांनी गुंड निलेश घायवळ प्रकरणावर भाष्य करत म्हटले की, सगळ्या गुंडांसोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे? राजकारणात सगळ्यांना गुंड लागतात. राजकारणाचे चित्र बदलाची गरज आहे, त्यांना भीती निर्माण करून राज्य करायचं आहे.

पुढे अंजली दमानिया यांनी म्हटले की, पुणे पोलिस आयुक्त यांनी शस्त्र परवाना रद्द केला असताना सुद्धा गृहराज्यमंत्री आदेश देतात, हे रोजचे तमाशे आहेत. संग्राम जगताप यांच्या विधानावर बोलताना दमानिया यांनी म्हटले की, धर्माचा आधार घेत लोकं वक्तव्य करतात. महाराष्ट्राची परिस्थिती बिहार होत चालली आहे, भ्रष्टाचार सगळीकडे आहे. राजकारण मध्ये काय चाललं आहे कळत नाही. घायवळ प्रकरणात मुख्यमंत्री म्हणतात पासपोर्ट आम्ही दिला नाही.

गलिच्छ पद्धतीने होत आहेत सगळ्या गोष्टी. महाराष्ट्राचे पोलिस खरंच काही काम करत आहेत का? हा प्रश्न उपस्थित होतो. वरून फोन आले की, पोलिस काम करतात. ईडी तर फोन केल्याशिवाय काम करत नाहीत. चौकशी लागल्याशिवाय कुठला ही अहवाल येत नाही. जैन मुनींनी केलेल्या विधानावर बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, कबुतरांकडून होणारे अनेक आजार आहेत.

जैन धर्माच्या डॉक्टर यांना विनंती केली होती की चुकीचं होतं आहे. पुढे दमानिया यांनी म्हटले, अर्थमंत्री दहावी पास आहेत? 9 लाख आपण आणणार कुठून? महाराष्ट्राच्या अर्थमंत्री यांच्याबद्दल मी बोलते आहे मला शिक्षणाची टीका करायची नाही पण त्यांना अर्थकारण कळतं का? राजकारणी यांच्याकडे राजकारण आणि नेते फोडण्यासाठी पैसे आहेत. रोहित पवारांनी दाखवलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री घायवळचे नाव घेतात. आत्ताच्या घडीला तो फरार आहे हे फार वेदनादायी आहे. मुख्यमंत्री अशा लोकांना पाठिंबा देत असतील तर हे चुकीचं आहे, असे त्यांनी म्हटले.