गरिबांना लुबाडणारे सावकार, कुख्यात गुंड ते कोरोना, सर्वांवर ‘अंकुश’ ! सोलापूरच्या पोलीस आयुक्तांची धडाकेबाज कामगिरी

अंकुश शिंदे (Solapur Police Commissioner Ankush Shinde) यांनी सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारण्याआधी शहरात प्रचंड गुन्हेगारी माजली होती. पण त्या गुन्हेगारीवरी अंकुश मिळवण्यात अंकुश शिंदे यांना यश आलं.

गरिबांना लुबाडणारे सावकार, कुख्यात गुंड ते कोरोना, सर्वांवर 'अंकुश' ! सोलापूरच्या पोलीस आयुक्तांची धडाकेबाज कामगिरी
गरिबांना लुबाडणाऱ्या सावकारांना धडा, गल्लीबोळातल्या दादालोकांना सळो की पळो ते कोरोनाला गाडण्यासाठी जीव ओतून मेहनत, सोलापुरच्या पोलीस आयुक्तांना सलाम!
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 3:17 PM

सोलापूर : काही माणसं खूप सामर्थ्यशाली असतात. अशी सामर्थ्यशाली लोकं जेव्हा तळागळातील सर्वसामान्यांसाठी झठतात तेव्हा ते माणुसकीचं एक सुंदर दर्शन घडवत असतात. त्यांच्या या कामगिरीतून ते शेकडोंना प्रेरणा देतात. त्यामुळेच शेकडो माणसं त्यांना सलाम करतात. अशाच एका कर्तव्यदक्ष आणि समृद्ध पोलीस अधिकाऱ्याच्या धडाकेबाज कामगिरीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे पोलीस अधिकारी म्हणजे सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ! (Solapur Police Commissioner Ankush Shinde)

अंकुश यांनी सोलापुरात प्रचंड कामं केली. त्यांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवलाच पण सध्याच्या या कोरोना काळात त्यांच्यातील हळवं मन अनेकांना बघायला मिळालं. अंकुश शिंदे (Solapur Police Commissioner Ankush Shinde) यांनी सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारण्याआधी शहरात प्रचंड गुन्हेगारी माजली होती. पण त्या गुन्हेगारीवरही अंकुश मिळवण्यात अंकुश शिंदे यांना यश आलं. त्यामुळेच सोलापुरात आज त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांनी सोलापुरात गरिबांना लुबाडणाऱ्या सावकरांना वठणीवर आणलं. गल्लीबोळ्यातल्या दादालोकांचा नायनाट केला. त्यांचे अवैध धंदे संपवले. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी सूटकेचा श्वास सोडला. अंकुश यांचं कोरोना काळातील कामगिरी देखील मोठी आहे. त्यांच्या याच कामगिरीविषयी सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कोरोना काळातील काम

कोरोना संसर्गाच्या वाढीस सोलापूर शहर अपवाद

राज्याच्या इतर भागाप्रमाणेच कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच त्याला सोलापूर शहर अपवाद म्हणावे लागेल. सोलापूरच्या ग्रामीण भागात दिवसागणिक कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असताना सोलापुरात मात्र कोरोना बाधितांची संख्या ही दुसऱ्या लाटेतही नियंत्रणात आहे. सोलापूर शहरात सध्या दररोज 100 च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शहरात कोरोना संसर्गाचा मोठा धोका दुसऱ्या लाटेतही तूर्तास तरी टळला आहे. यामागे पोलिसांची विशेषतः पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची खमकेगिरी कामाला आली आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतलेल्या काही कटू निर्णयाची प्रचिती सोलापुरकरांना आता येत आहे. पोलिसांच्या कडक शिस्तीमुळेच आज सोलापुरात सामाजिक स्वास्थाबरोबरच नागरिकांच्या आरोग्य सुरक्षित राहिलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सोलापूर शहर सेफ झोनमध्ये 

गेल्यावर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये लागलेल्या टाळेबंदीत 28 जुलैपासून शिथिलता देण्यात आली. त्यामुळे आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा मोठा वावर सुरु होणार होता. नेमके झाले तेच, शिथिलता दिल्यानंतर लोकांनी जणू कोरोना हद्दपार झाल्याचं समजत कोणतीही खबरदारी न घेता दैनंदिन कामकाजास सुरुवात केली. मात्र, सोलापूर शहर त्याला अपवाद राहिलं. त्यामुळेच आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर सेफ झोनमध्ये आहे.

सोलापूर शहरात मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

अनलॉक सुरु झाल्यानंतर पोलीस आयुक्त शिंदे यांनी शहारत गर्दीच कुठे होणार नाही यासाठी मोठी खबरदारी घेत  कारवाईचा सपाटा चालू ठेवला होता. शहरातील नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य केलं. याशिवाय जे मास्क वापरत नाही त्यांच्याविरोधात कठोर दंडात्मक कारवाई केली. सोलापूर पोलिसांनी ऑगस्ट 2020 ते मे 2021 या काळात 1 कोटी 1 लाख 98 हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत 4469 गुन्हे दाखल केले. तसेच शहरात मोकाट फिरणाऱ्यांवर थेट वाहन जप्तीचा बडगा उगारला गेला.

अंकुश शिंदे यांचे तेव्हाचे निर्णय आज उपयोगी

राज्याच्या इतर भागात अनलॉकमध्ये पोलीस कारवाई करत नाहीत. मात्र, सोलापुरात पोलीस कारवाई करत आहेत, अशाप्रकारे शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सुरु होता. पण सोलापूर शहर पोलीस आयुक्तांची शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेले निर्णय आज कामी  येत आहेत. सामाजिक स्वास्थास हानिकारक ठरणाऱ्या प्रवृत्तीचा वेळीच बिमोड केल्यामुळे नागरिकाचं आरोग्य सुरक्षित राहीलं आहे. नागरिकांना मास्कची सवयच लागून गेली असल्यामुळे संसर्गाचा धोका टळला आणि कोरोनाबाधित रुग्णाची संख्या मर्यादित राहिली आहे.

कामगार वसाहतींसाठी ‘माझा कोरोनामुक्त वॉर्ड’ मोहिम

राज्याच्या इतर शहरापेक्षा सोलापुरात  कामगारांची संख्या जास्त आहे. इथे असणाऱ्या विडी उद्दोग आणि यंत्रमाग उद्योगामुळे या शहराची कामगारांचं शहर अशी ओळख आहे. जवळपास 70 हजार पेक्षा जास्त मजूर शहरात राहतात. सोलापूरच्या कामगार बहुल भागात कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला नियंत्रणात आणणे प्रशासन, आरोग्य विभागाला परवडणारे नव्हते. मात्र पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यासाठी गतवर्षीही मोठा पुढाकार घेत नगरसेवक आणि हद्दीतील पोलीस स्टेशन यांचा संयुक्त उपक्रम राबवत ‘माझा कोरोनामुक्त वॉर्ड’ हे अभियान राबवले. यात सातत्य ठेवल्याने आज शहरातील कामगार बहुल वसाहती कोरोनापासून दूर राहिल्या आहेत.

यंत्रमाग कारखान्यात येणाऱ्या कामगारांची नियमित तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती कारखानदारांना करण्याचे  फर्मान काढले गेले होते. त्यामुळे बाधा झालीच तर अशा लोकांना वेळेत उपचारास मदत झाली. त्यात आजही सातत्य असल्यामुळे कामगारांनाही आरोग्याच्या बाबतीत चांगलीच शिस्त लागली आहे.

यात्रा प्रतिकात्मक काढली

सालाबादाप्रमाणे जानेवारी महिन्यात संपन्न होणाऱ्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिदेश्वर यात्रा संपन्न करण्यासाठी मोठा रेटा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुरु होता. यात्रेचा मुख्य सोहळा असलेला अक्षता सोहळ्याला लाखाहून अधिक भाविक एकत्रित येणे हे परवडणारे नव्हते. त्यामुळे केवळ पन्नास जणांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक यात्रा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्दर्शनाखाली पार पडली. त्यावेळी यात्रा संपन्न करायला हवे होते, असा सूर असणाऱ्या लोकांना गर्दीच्या परिणामाचा अंदाज येऊन पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचे आज तोंडभरून कौतुक केले जात आहे.

लग्न समारंभासाठी फक्त 50 जणांना अनुमती

शहरात साजरे होणारे वेगवेगळे उत्सव, जयंती, मिरवणुका नाकारून होणारी गर्दी टाळण्याची उपाययोजना केली गेली आणि आजही यात सातत्य असल्याने राज्याच्या इतर शहरात अनलॉकमध्ये जी झुंबड उडाली ती सोलापुरात उडाली नाही. शहरातील गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असल्यामुळे सोलापुरात कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेपासुन ते आजतागायत एकही जंगी लग्नसोहळा संपन्न झाला नाही. वधू वर यांच्यासह वऱ्हाडी मंडळींच्या आधारकार्डसहित संपूर्ण माहिती घेऊन केवळ 50 जणांच्या विवाह सोहळ्याला परवानगी देण्यात आल्यामुळे लग्न  आणि पन्नास वऱ्हाडी असे समीकरण झाले आहे.

शेतकऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांची रोजीरोटी थांबली होती. याला बळीराजा कसा अपवाद ठरणार? मात्र अंकुश शिंदे यांनी शेतकऱ्यांना पोलिसांकडून कसलाच त्रास होणार नाही, अशी सक्त सूचनाच दिली होती. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला माल शहरात मोकळी जागा उपलब्ध करून पोलिसांच्या उपस्थितीत विक्रीस परवानगी दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार झाला होता. यात आजही सातत्य आहे.

लोकप्रतिनिधींना विश्वास घेऊन काम

सरकारची कोणतीही योजना असो किंवा मोहीम असो, जोपर्यंत लोकांचा सहभाग यात येत नाही तो पर्यंत मोहीम किंवा अभियान एक चळवळ बनत नाही. हेच अंकुश शिंदे यांनी हेरून कोरोना संक्रमणाच्या काळापासून कोरोनामुक्त  वॉर्ड ही संकल्पना नगरसेवकांच्या मदतीने राबवित आहे. वॉर्डाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनीधींना विश्वासात घेऊन काम करत असल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे.

पोलीस सहकाऱ्यांची काळजी

अंकुश शिंदे यांनी शहरातील पोलिसांचे कुटुंबप्रमुख म्हणून पोलिसांच्या अडचणी समजावून घेतल्या. शिंदे पोलिसांना कोरोना काळात वैद्यकीय सेवा तत्परतेने मिळण्यासाठी झटत आहे. त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्याचे मनोबल वेळोवेळी वाढविले. आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा ठेवत इमानदारीने काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची पाठ थोपटली. तसेच कामाचा हलगर्जीपणा करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे.

गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कामगिरी

सोलापुरात दादालोकांसाठी कर्दनकाळ

सोलापुरात गल्लोगल्लीत दादा लोकांची चांगलीच दहशत माजली होती. त्यांच्या दहशतीमुळे गल्लीत सहसा त्यांच्या नादाला कुणी लागत नव्हते. मग याच दहशतीच्या जोरावर अशा दादा लोकांचे अवैध धंधे सुरु राहायचे. कारण अशा दादांच्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस कोण करणार? त्यामुळे सोलापुरात गल्लीबोळात अशा तथाकथित गुंड प्रवृत्तीच्या दादा लोकांची दहशत होती. पण अंकुश शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापूर पोलिसांनी त्यांची सळो की पळो करुन सोडलं. अंकुश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे आज सोलापूर शहरातील अनेक गल्लीबोळ अशा दादालोकांपासून मुक्त झाली आहेत.

सावकारांचे धाबे दणाणले

सोलापूर शहरात कायद्याची पायमल्ली करत बिनधास्त पणे खासगी सावकार आपले व्यवसाय करत होते. कुणी दहा टक्क्यावर तर कुणी चाळीस टक्क्यावर गोरगरीब आणि गरजू लोकांना व्याजाने पैसे देत असत. या वर्गाची एक प्रकारे शहरातील गरिब नागरिकांची वर्षानुवर्षे पिळवणूक सुरूच होती. मात्र अंकुश शिंदे यांनी यावर कडक कारवाई केली. अंकुश यांनी शहरातील 30 पेक्षा जास्त सावकारांना गजाआड केलं. यात काही नगरसेवक आणि समाजसेवेचा आव आणणाऱ्या खासगी सावकारांचा समावेश आहे. शिवाय गोरगरिबांच्या जागा हडपणाऱ्या लोकांना थेट तुरुंगात रवानगी केलीय.

गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांनाही घरचा रस्ता

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारणाऱ्या पूर्वी सोलापूर शहर हे जणू गावगुंडांचे शहर आणि अवैध धंद्याचे आगार आहे कि काय अशी परिस्थिती होती. मात्र अवैध धंधे करणाऱ्या लोकांवर कारवाई तर झालीच शिवाय अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा अंकुश शिंदे यांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे.

13 जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, 49 आरोपी तडीपार

कायदा सगळ्यांसाठी सामान असतो हे अंकुश शिंदे यांनी सोलापूरकरांना त्यांच्या कृतीतून दाखवलं आहे. शहरात गुंडागर्दी करणाऱ्या 13 जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. तर 49 जणांना तडीपार केलं. कदाचित अशा प्रकारची कारवाई होण्याची पोलीस आयुक्तालयातील ही पहिलीच वेळ असावी.

हेही वाचा : Special Story | संयमी स्वभाव आणि धडाकेबाज कामगिरी, मराठमोळ्या अधिकाऱ्याची कर्तबगार कहाणी

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.