तो ढसाढसा रडला… तुमच्या तर तळपायाची आग मस्तकात जाईल… कांद्याचे 73 पोते विकून मिळाले फक्त…. बळीराजाचा संताप अनावर

Onion Price Reduce: कांद्याने शेतकर्‍यांचे वांधे केले आहेत. हिवाळी कांद्यानंतर उन्हाळी कांद्याने पण शेतकर्‍यांचे वाटोळे केले आहे. कांद्याला भावच न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याची व्यथा पाहून तुमचाही संतपा अनावर होईल.

तो ढसाढसा रडला... तुमच्या तर तळपायाची आग मस्तकात जाईल... कांद्याचे 73 पोते विकून मिळाले फक्त.... बळीराजाचा संताप अनावर
कांद्याची किंमत ऐकून संताप
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 08, 2026 | 2:56 PM

Onion Price Reduce: सोलापूर जिल्ह्यातील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. 73 पोती विकून शेतकर्‍याच्या हातात फक्त 400 रुपये पडले आहेत. कांद्याला प्रतिकिलो 50 पैसे भाव मिळाला आहे. बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली. करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 73 गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये मिळाले आहेत.

कांद्याने केली थट्टा

अंकुश गुंजाळ यांनी आपल्या शेतात कष्टाने पिकवलेला कांदा 21 एप्रिल 2026 रोजी सोलापूरच्या शरीफ ट्रेडर्स’ या आडत दुकानावर विक्रीसाठी आणला होता. एकूण ७३ पिशव्या (पोती) कांदा त्यांनी विक्रीसाठी लावला होता. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने किंवा मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ ५० पैसे इतका नीचांकी भाव मिळाला.

मिळालेल्या पट्टीनुसार, कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम आणि त्यावर झालेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. 73 पिशव्या कांदा विकल्यानंतर अंकुश गुंजाळ शेतकर्‍याला एकूण 5068 रुपये मिळाले होते. वाहतुकीचे गाडी भाडे, हमाली, तोलाई आणि इतर आडत खर्च वजा जाता, प्रत्यक्षात शेतकर्‍याला केवळ 400 रुपये मिळाले आहेत. शेतकर्‍याकडे सरकारने लक्ष देऊन प्रत्येक पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे.

शेतकर्‍यांचा संताप

राज्यातील अनेक भागात शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. भावच मिळत नसेल तर बाजार समितीत कांद्या न्यायचाच कशाला असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. सद्याची युद्धजन्य स्थिती आणि इतर धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा संताप यामुळे अनावर झाला आहे.

1262 किलो कांदा विकूनही उलट अडत्याला द्यावा लागला 1 रुपया

पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांची धक्कादायक व्यथा समोर आली आहे. तीन महिने मेहनत करून पिकवलेला 1262 किलो कांदा बाजारात विकल्यानंतर त्यांना पैसे मिळण्याऐवजी उलट अडत्याला 1 रुपया द्यावा लागला. हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात एकही रुपया उरला नाही. वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या घटनेमुळे कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर पुन्हा संताप व्यक्त केला जात आहे.

Follow Us