अमोल मिटकरी यांच्या अडचणी वाढणार? सोलापुरातून महत्त्वाची माहिती समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निवेदन देण्यात आलंय.

अमोल मिटकरी यांच्या अडचणी वाढणार? सोलापुरातून महत्त्वाची माहिती समोर
अमोल मिटकरी
| Edited By: | Updated on: Dec 10, 2022 | 9:54 PM

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात सोलापूर भाजपकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निवेदन देण्यात आलंय. आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपने मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. त्यामुळे अमोल मिटकरी यांच्या कदाचित अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरुय.

सोलापूर शहर भाजपने सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारीचे निवेदन दिले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर आहेत”, असे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

दरम्यान अमोल मिटकरींवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पण पुढच्या दोन दिवसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर आहेत, त्यांनी अमीन सयानी यांचा मेरे भाई और बहनो हा डायलॉग चोरला”, अशी टीका काल शेतकरी मेळाव्यात अमोल मिटकरी यांनी केली होती.

आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याविरोधात सोलापूर शहर भाजप आक्रमक झालीय. त्यातूनच सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीचे निवेदन देण्यात आलंय.