कारखान्याची निवडणूक, सभांवर सभा, साोलापुरातलं राजकारणही तापलं, अखेर महाडिक गटासाठी आनंदाची बातमी

भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र विश्वराज महाडिक विजयी झाले आहेत.

कारखान्याची निवडणूक, सभांवर सभा, साोलापुरातलं राजकारणही तापलं, अखेर महाडिक गटासाठी आनंदाची बातमी
| Edited By: | Updated on: Nov 14, 2022 | 9:10 PM

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र विश्वराज महाडिक विजयी झाले आहेत. महाडिक गटासाठी ही खूप आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे. पहिल्याच निवडणुकीत यश संपादन झाल्याने उद्यापासूनच कामाला लागणार असल्याची प्रतिक्रिया विश्वराज महाडिक यांनी दिली. विशेष म्हणजे या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालाय. त्यामुळे महाडिक यांची विजयी हॅट्रिक मानली जातेय.

भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने विश्वराज महाडिक हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झालाय.

“भीमा साखर कारखान्याची निवडणूक लढविल्याने स्वतःवर आणि साहेबांच्या नेतृत्वावरील आत्मविश्वास वाढलाय”, अशी प्रतिक्रिया विश्वराज महाडिक यांनी दिली.

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एवढा मोठा लीड मिळेल याचा अंदाज आम्हाला होता तो प्रत्यक्षात उतरल्याने आनंद होतोय. भीमा निवडणुकीचा अनुभव माझ्यासाठी नवीन होता.

विरोधकांनी माझ्यावर टीका केली हे हास्यास्पद होते. मात्र सभासद आमच्या पाठीशी राहिले, असं विश्वराज म्हणाले.

आम्ही आता लवकरच भीमा साखर कारखान्यावर दीड लाख लिटरचा इथेनॉलचा प्रकल्प उभारणार, असं विश्वराज यांनी सांगितलं.

“या विजयामुळे जबाबदारी वाढली आहे. वर्षभरातच इथेनॉल प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे उद्यापासूनच कामाला लागणार”, असंदेखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालेलं बघायला मिळालं. या निवडणुकीत भाजप खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आणि अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्हा गटाच्या नेत्यांकडून झालेल्या सभा आणि त्या सभांमधील त्यांचं वक्तव्यं देखील गाजली होती. अखेर या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय.

– भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

– भीमा सहकारी साखर कारखान्यावर खासदार धनंजय महाडिकांची विजयी हॅट्रिक

– खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भीमा शेतकरी विकास आघाडीचे सर्व 15 उमेदवार विजयी

– राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना धूळ चारत महाडिक गटाने भीमा कारखान्यावर राखले वर्चस्व

– खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच त्यांचा मुलगा विश्वराज महाडिक हे देखील विजयी

– निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी जाहीर केले निकाल

निकालाची आकडेवारी खालीलप्रमाणे :

दोन्ही गटाचे उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते तसेच एकूण मताधिक्य खालील प्रमाणे :

– संस्था प्रतिनिधी गट :

( विजयी)
– धनंजय महाडिक – 31 ( महाडिक पॅनल)

– राजेंद्र चव्हाण – 12 ( राजन पाटील गट)

– मताधिक्य : 19 मते

=========

पुळूज व्यक्ती उत्पादक गट :

( विजयी)
विश्वराज महाडिक- 10,629 (महाडिक पॅनल)

देवानंद गुंड – 4103 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य : 6526)

==========

पुळूज व्यक्ती उत्पादक गट :

(विजयी)
– बिभीषण वाघ- 10237 (महाडिक पॅनल)

– कल्याणराव पाटील – 4172 (राजन पाटील पॅनल) पराभूत)

( मताधिक्य – 6065 )

=========

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट :

( विजयी)
संभाजी कोकाटे – 10588 (महाडिक पॅनल)

शिवाजी भोसले – 4170 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6418 )

==========

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट :

( विजयी)
सुनील चव्हाण – 10563 (महाडिक पॅनल)

राजाराम माने – 3978 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6585 )

==========

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट :

( विजयी)
तात्यासाहेब नागटिळक – 10764 (महाडिक पॅनल)

पंकज नायकुडे – 4251 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6513)

========

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट :

( विजयी)
संतोष सावंत – 10138 (महाडिक पॅनल)

विठ्ठल रणदिवे – 3984 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6154 )

==========

अंकोली व्यक्ती उत्पदक गट :

( विजयी)
सतीश जगताप – 10190 (महाडिक पॅनल)

भारत पवार – 3995 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6195 )

=========

( विजयी)
गणपत पूदे – 10031 (महाडिक पॅनल)

रघुनाथ सुरवसे – 3865 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6166)

========

कोन्हेरी गट :

( विजयी)
राजेंद्र टेकळे – 10571 (महाडिक पॅनल)

कुमार गोडसे – 4374 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6197 )

==========

अनुसूचित जाती जमाती गट :

( विजयी)
बाळासाहेब गवळी – 10746 (महाडिक पॅनल)

भारत सुतकर – 4217 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य : 6259)

==========

महिला राखीव :

( विजयी)
सिंधू जाधव – 10778 (महाडिक पॅनल)

अर्चना घाडगे – 4141 (राजन पाटील पॅनल)

( मतधिक्य – 6637)

========

महिला राखीव गट :

( विजयी)
प्रतीक्षा शिंदे – 10292 (महाडिक पॅनल)

सुहासिनी चव्हाण – 4022 (राजन पाटील पॅनल)

( मतधिक्य – 6270 )

=======

इतर मागास प्रवर्ग गट :

( विजयी)
अनिल गवळी – 10864 (महाडिक पॅनल)

राजाभाऊ भंडारे – 4159 (राजन पाटील पॅनल)

( मतधिक्य : 6705)

===========

भटक्या विमुक्त जाती जमाती :

( विजयी)
सिद्राम मदने – 10778 (महाडिक पॅनल)

राजू गावडे – 4149 (राजन पाटील पॅनल)

( मतधिक्य – 6629 )