AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज तोडणी मोहिमेचा फटका बसला चक्क महाविकास आघाडीतील मंत्र्यालाच; अंधारात करावे लागले भूमिपूजन

पुणे-सोलापूर महामार्गानाजिक "शहा पाटी" येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे राज्यमंत्री भरणे यांना चक्क अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम करावा लागला.

वीज तोडणी मोहिमेचा फटका बसला चक्क महाविकास आघाडीतील मंत्र्यालाच; अंधारात करावे लागले भूमिपूजन
Datta Bharane electricsity.Image Credit source: TV9
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 07, 2022 | 12:04 AM
Share

सोलापूर: महावितरणने राज्यातील शेतकऱ्यांकडून थकीत वीज बिलांची वसूली मोहीम जोरदार सुरू केली आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत (Electricity) पुरवठा तोडण्यात येत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांना बसत आहे. वीज तोडल्यामुळे अनेक गावात वीजपुरवठा खंडित (Power outage) झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या या मोहिमे विरोधात अनेक संघटना,भाजप नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. एकीकडे परिस्थिती सुरु असतानाच दुसरीकडे मात्र सत्तेतील एका मंत्र्याला (Minister) रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम पार पाडावा लागला. त्यामुळे या विषयाची जोरदार चर्चा सुरु होती.

सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीच्या सूरज जाधवला शेतीत सातत्याने अपयश येऊ लागल्याने निराश होत त्याने आपल्या शेतात एक व्हिडिओ शूट करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती, त्यामुळे चुकीच्या शेतकरी धोरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हाच धागा पकडत आज सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी घरासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

सक्तीच्या वसुलीतून मुक्तता करा

याबरोबरच आजच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा पुणे-सोलापूर मार्गावरील टेंभुर्णी येथे अडविला होता. शिवाय सक्तीच्या वसुलीतून शेतकऱ्यांची मुक्तता करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम

त्यांनतर आज संध्याकाळी भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील शहा गावात 12 कोटी 15 लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे-सोलापूर महामार्गानाजिक “शहा पाटी” येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे राज्यमंत्री भरणे यांना चक्क अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम करावा लागला.

मोबाईलचे लाईट लावण्याच्या सूचना

यावेळी स्वतः मंत्रीमहोदय यांना कार्यकर्त्यांना मोबाईलचे लाईट लावण्याच्या सूचना कराव्या लागल्या. त्यामुळे वीजतोडणी मोहिमेच्या प्रश्न राज्यात पेटलेला असताना सत्तेतील मंत्र्यानांच या वीज तोडणी मोहिमेचा फटका बसल्याचे यावेळी दिसून आले.

अंधारात भूमिपूजन कार्यक्रम

हा अंधारातील भूमिपूजन कार्यक्रम झाल्या नंतर पुन्हा पुढे अनेक ठिकाणी विकास कामांचे उद्घाटन होते, यावेळी काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत असल्याने त्याठिकाणी कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

संबंधित बातम्या

बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी कुणाला द्यायची तर देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी: नितेश राणे

Dattatraya Bharne| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडीतील निवासस्थाना समोर सोलापूरच्या भाजप नेत्यांचे आंदोलन…

नारायण राणेंना BMC ची कारणे दाखवा नोटीस,अधिश बंगला प्रकरणी 7 दिवसांत खुलासा मागवला

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी