Dattatraya Bharne| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडीतील निवासस्थाना समोर सोलापूरच्या भाजप नेत्यांचे आंदोलन…

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते, ते त्यांच्या निवासस्थानी नव्हते, त्यामुळे यावेळी पोलिसांनी आंदोलकांना चार किलोमीटर अंतरावर वरच रोखले, यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये काहीवेळ खडाजंगी झाली, आंदोलक अधिक आक्रमक झाले व त्यांनी तेथूनच मोर्चा काढत अखेर राज्यमंत्री भरणे यांचे निवासस्थान गाठले, व तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.. 

Dattatraya Bharne| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडीतील निवासस्थाना समोर सोलापूरच्या भाजप नेत्यांचे आंदोलन...
farmers Andon at Bhare wadi
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 6:54 PM

सोलापूर-  वीजतोडणी प्रश्नावरून सध्या महाराष्ट्रात शेतकरी आक्रमक झाले असताना, इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya Bharne)यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील घरासमोर सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे(BJP) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज निषेध आंदोलन केले. वीजतोडणी (Power outage) प्रश्नावरून महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन होत असताना पहिल्यांदाच यावेळी मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन झाले आहे.. आंदोलकांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ठिय्या आंदोलन सुरू

आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते, ते त्यांच्या निवासस्थानी नव्हते, त्यामुळे यावेळी पोलिसांनी आंदोलकांना चार किलोमीटर अंतरावर वरच रोखले, यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये काहीवेळ खडाजंगी झाली, आंदोलक अधिक आक्रमक झाले व त्यांनी तेथूनच मोर्चा काढत अखेर राज्यमंत्री भरणे यांचे निवासस्थान गाठले, व तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी च्या सुरज जाधवला शेतीत सातत्याने अपयश येऊ लागल्याने निराश होत त्याने आपल्या शेतात एक व्हिडीओ शूट करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता . यानंतर त्याला उपचारासाठी हलविल्यावर नंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला . या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आणि चुकीच्या शेतकरी धोरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.  हाच धागा पकडत आज सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी घरासमोर निषेध आंदोलन झाले.

घरासमोर आंदोलन का केले?

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज सोलापूर मध्ये असताना भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानासमोर भाजपने आंदोलन केले आहे . जर पालकमंत्री सोलापूर मध्ये येणार होते तर ते इंदापूर ऐवजी सोलापुरात देखील करता आले असते . अर्थात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पहिल्यांदा सुरज जाधव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणेही गरजेचे होते . पण भरणे याना याला वेळ न मिळाल्याने भाजपने आंदोलनाची संधी साधली आहे, मात्र सोलापूर जिल्ह्यात भरणे असताना इंदापूर येथे आंदोलन का केले अशी ही चर्चा सोलापूर जिल्ह्यात व इंदापूर मध्ये होत आहे.

आंदोलकांनी भरणेंच्या घरावर चिटकविले निवेदन

पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आंदोलकांनी आज त्यांच्या घरासमोर निदर्शने करत महाविकास आघाडी सरकार तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, भरणे यांचे स्वीय सहाय्यक किंवा पोलीस प्रशासनाकडे आपले निवेदन देण्यात यावे असे आंदोलकांना सांगण्यात आले, मात्र आंदोलक अधिक आक्रमक झाले व त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोरील भिंतीला त्यांची निवेदन चिटकविले व आपला निषेध केला.

वीज तोडणी मोहीम तातडीने थांबवावी

महाराष्ट्रात सर्वत्र वीज तोडणी मोहिमेच्या विरोधात आंदोलन होत आहे, मात्र सरकारमधील एखाद्या मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन होणे ही आजच्या परिस्थितीत पहिल्यांदाच अशे घडले आहे, अशा प्रकारचे हे भाजपच व ते ही बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्यांचे आंदोलन होणे इंदापूर मधील पहिली ची गोष्ट आहे, त्यामुळे या आंदोलनाची चर्चा इंदापूर सहमहाराष्ट्रात होत आहे. सोलापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या वीज तोडणी मोहीम तातडीने थांबवावी अशी भाजपाची प्रमुख मागणी आहे, व ती जर थांबली तर यामुळे बळीराजाला सध्या थोडासा दिलासा नक्की मिळणार आहे.

Pune Metro : …अशी साकार झाली पुणे मेट्रो ! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उलगडा प्रवास

दोन पवारांच्या निशाण्यावर राज्यपाल, अजित पवार, शरद पवार आज काय म्हणाले?

IND vs SL: अवघ्या 3 दिवसांत श्रीलंकेचं टीम इंडियासमोर सरेंडर, जाणून घ्या भारताच्या विजयाची 4 कारणं

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.