AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur: सोलापुरात ट्रक चालकाचे हातपाय बांधून शेतात फेकला अन् स्टीलने भरलेला ट्रक पळविला

स्टीलने भरलेला ट्रक घेऊन आष्टी परिसरातून निघाला होता. त्याच दरम्यान अज्ञात सहाजणांच्या टोळीने त्यांचा ट्रक थांबवला. त्यानंतर चोरट्यांनी ड्रायव्हर प्रवीण सरगरला मारहाण केली. त्याला चाकू व तलवारीचा या धाक दाखवत त्याचे हातपाय बांधून त्याला नजीकच्या ऊसाच्या शेतात टाकून दिले. त्यानंतर स्टीलने भरलेला ट्रक घेऊन पोबारा केला आहे.

Solapur: सोलापुरात ट्रक चालकाचे हातपाय बांधून शेतात फेकला अन् स्टीलने भरलेला ट्रक पळविला
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 05, 2022 | 10:42 AM
Share

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील आष्टी (Ashti) येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जालन्याहून सांगलीकडे 13 टन स्टील घेऊन जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक रस्त्यात अडवत ट्रक (Truck) पळवून नेल्याची घटना समोर आलीय आहे. सोलापूर जिल्ह्यातील आष्टी शिवारात परिसरात ही घटना घडली आहे. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला चोरट्यांनी आधी थांबवले . त्यानंतर ट्रक ड्रायव्हरला तलवार व बंदुकीचा धाक दाखवत अज्ञात 6 चोरट्यांनी हा ट्रक लांबवला आहे. यावेळी चोरटयांनी हातपाय बांधून आष्टी शिवरातील उसाच्या फडात फेकून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मोहळ पोलिसात (Mohal Police )गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घडली घटना

घटनेच्या वेळी ट्रक ड्रायव्हर स्टीलने भरलेला ट्रक घेऊन आष्टी परिसरातून निघाला होता. त्याच दरम्यान अज्ञात सहाजणांच्या टोळीने त्यांचा ट्रक थांबवला. त्यानंतर चोरट्यांनी ड्रायव्हर प्रवीण सरगरला मारहाण केली. त्याला चाकू व तलवारीचा या धाक दाखवत त्याचे हातपाय बांधून त्याला नजीकच्या ऊसाच्या शेतात टाकून दिले. त्यानंतर स्टीलने भरलेला ट्रक घेऊन पोबारा केला आहे. चोरट्यांनी यातून एकूण 13 लाख 61 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.. याबाबत अज्ञात 6 जणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या चोरट्यांच्या मागावर सोलापूर ग्रामीण पोलिसांची तीन पथक असल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी दिलीय.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा