शाळेसाठी ‘या’ गावाने घेतला कर्नाटकात जाण्याचा निर्णय, रस्ता नाही, वीज नाही आणि पाणीही नाही..

| Updated on: Dec 06, 2022 | 9:38 PM

शाळेतील मुलांसाठी दोन शिक्षक असूनही आणि विद्यार्थी पुरेसे असूनही अजूनही गावामध्ये पक्की शाळा बांधली गेली नाही.

शाळेसाठी या गावाने घेतला कर्नाटकात जाण्याचा निर्णय, रस्ता नाही, वीज नाही आणि पाणीही नाही..
Follow us on

सोलापूर: महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद प्रचंड टोकाला गेला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर कन्नडिग्गांची तोडफोड केली आहे. तर महाराष्ट्रातही जशास तसे उत्तर देण्यात आल्यानंतर हा वादा आणखी विकोपाला गेलाय. त्यातच महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकात जात असताना त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. त्यानंतरही हा वाद वाढत गेला आहे.

एकीकडे कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्रातील जनतेचा आवाज बुलंद होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी मात्र कर्नाटकात जाण्यासाठी ठराव मांडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मात्र आम्ही महाराष्ट्रात का जात आहोत त्याची कारणं सोलापूर जिल्ह्यातील गाावांनी दिला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गावामध्ये पक्के रस्ते झाले नाहीत तर काही गावांमध्ये विजेचा, पाण्याचा प्रश्न जैसे थे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे आता अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावातील जिल्हा परिषदेची शाळा भरते मंदिरामध्ये भरत असल्याने आंदेवाडी ग्रामपंचायतीने कर्नाटकात जाण्याचा ठराव मांडला आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावातील जिल्हा परिषदेची शाळा अजून मंदिरामध्येच भरते आहे. गावामध्ये 80 विद्यार्थी असूनही आंदेवाडीमध्ये अजून शाळा नाही.

शाळेतील मुलांसाठी दोन शिक्षक असूनही आणि विद्यार्थी पुरेसे असूनही अजूनही गावामध्ये पक्की शाळा बांधली गेली नाही. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी ग्रामपंचायतीने कर्नाटकात जाण्याबाबतचा ठराव केला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

त्यामुळे गावातील गावातील नागरिकांनी आम्हाला गावात रस्ते, वीज, पाणी मिळत नाही. त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी गावातील नागरिकांनी सांगितले की, आमच्या भागात एकही रस्ता नाही. काही दिवसांपूर्वी आमच्या गावातील एक पेशंट रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच दगावला होता आणि त्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे रस्ते खराब असण्याचे.

2020 साली गावामध्ये जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात पुराचा फटका बसला होता. त्यावेळी गावामध्ये ना कोणत्या आमदारांनी ना कोणत्या खासदारांनी भेट दिली होती. त्यामुळे आमच्याकडे नेहमीच दुर्लक्षे केले जाते असा ठपकाही नागरिकांनी राजकारणातील लोकांवर ठेवला आहे.