TET पेपरफुटीप्रकरणात सोलापूर कनेक्शन उघड, पोलीस प्रशिक्षण संस्था चालक अटकेत

TET Exam Scam Solapur: शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या एका आरोपीला सोलापूरातून अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटीप्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

TET पेपरफुटीप्रकरणात सोलापूर कनेक्शन उघड, पोलीस प्रशिक्षण संस्था चालक अटकेत
टीईटी परीक्षा सोलापूर कनेक्शन, प्रकाश पवार अटकेत
| Edited By: | Updated on: Aug 11, 2026 | 3:28 PM

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. TET पेपरफुटीचे तपास करणाऱ्या विशेष पथकाने सोलापुरातून प्रकाश पवार याला अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे सोलापूरमधील परीक्षार्थी उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रकाश पवार याला अटक

सोलापुरातील कुमठे गावात प्रकाश पवार हा ध्रुव प्रतिष्ठान नावाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. जवळपास 15-20 वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करणारी अकॅडमी चालवतो. TET पेपरफुटी प्रकरणात या आधी अटकेत असलेल्या आरोपीशी प्रकाश पवार हा संपर्कात होता तसेच काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे देखील त्याने मुख्य आरोपीना दिल्याची प्राथमिक माहिती आहे प्रकाश पवार याचा या पेपर फुटी प्रकरणात नेमका संबंध काय होता? विद्यार्थ्यांची कागदपत्रे त्याने आरोपीना का दिली याचा तपास सध्या पोलिसांमार्फत सुरू आहे.

भिवंडी येथे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. प्रकरणाचा तपास भिवंडी पोलिसांचे विशेष पोलीस पथक करत आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला अगोदरच अटक करण्यात आली होती. सुरुवातीला दिल्ली, आग्रा आणि बिहारमधून आरोपींना अटक करण्यात आली होती. तर प्रश्नपत्रिका फुटीचे राज्यातील धागेदोरे समोर आले होते. तपासादरम्यान प्रकाश पवार याचे नाव समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली. त्याच्या संस्थेतून महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे शोधण्यात येत आहे. इतर व्यक्तींचा या परीक्षेशी काय संबंध होता याचा तपास करण्यात येत होता. भिवंडी पोलिसांनी टीईटी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे.

असा अडकला प्रकाश पवार

पोलिसांनी अगोदर उत्तर भारतात कारवाई केली. तपासाची व्याप्ती वाढल्यावर महाराष्ट्रातील काही जणांवर संशयाची सुई फिरली. पोलिसांनी कडी जुळवली. त्यात प्रकाश पवार याचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. तेव्हा त्यांच्या हाती सज्जड पुरावे लागले आणि त्याला अटक करण्यात आली. यापूर्वी ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांना पवार याने काही दस्तावेज पुरवल्याचे समोर आले आहे. आरोपीला आजच न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us