“दुसरा मंडप मारण्याचा शरद पवार आणि रोहित पवारांमध्ये दम आहे का?”; भाजपच्या आमदाराने सरळ पवारांना दम विचारला, नेमकं कारण काय..?

| Updated on: May 28, 2023 | 12:29 AM

पवारांनी यात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा याचे वाईट परिणाम होतील असं मतही त्यांना यावेळी व्यक्त केले. जयंतीत काहीतरी वाद आहे असे काही समोर आले तर हे प्रकरण पवारांना महागात पडणार असल्याचा इशाराच मी देतो अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.

दुसरा मंडप मारण्याचा शरद पवार आणि रोहित पवारांमध्ये दम आहे का?;  भाजपच्या आमदाराने सरळ पवारांना दम विचारला, नेमकं कारण काय..?
Sharad pawar
Follow us on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून चाललेल्या वादावरून आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी आता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, शिवनेरीवर, रायगडावर जाऊन दुसरा मंडप मारण्याचा शरद पवार आणि रोहित पवारांमध्ये दम आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. तसे केल्यास लोक ठोकून काढतील हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे इथे मऊ लागतंय म्हणून ते कोपऱ्याने उकरण्याचा प्रयत्न करत आहेत अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. मागील वर्षी सत्तेचा वापर करून त्यांनी मोठी चूक केली होती, मात्र आता ती चूक आजोबा आणि नातवाने पुन्हा करू नये असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण झाले अशी बातमी येऊ लागली तर याचा पश्चाताप आजोबा आणि नातवाला होईल असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर जयंतीवरून जोरदार निशाणा साधला आहे.

चौंडीमधील अहिल्यादेवींची जयंती म्हणजे राजकारणाचे सेंटर वाटते का? पूर्वीपासून पवारांपैकी कोणी जयंती घेत असते तर ठीक होते.मात्र आता रोहित पवारमधूनच कुठून उगवला असा सवाल त्यांनी रोहित पवार यांना केला आहे.

केंद्रात मंत्री आणि राज्यात सत्ता असताना शरद पवार तिकडे एकदाही फिरकले नाहीत. मग गेल्यावर्षी जयंतीला येण्याचे कारण काय?. जयंतीच्या वादावरून त्यांनी शरद पवार यांना म्हटले आहे की, तुमच्या नातवाला लाँच करायचे ते ठिकाण आहे का? असा खोचक सवालही त्यांनी त्यांना केला आहे.

त्यामुळे पवारांनी यात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा याचे वाईट परिणाम होतील असं मतही त्यांना यावेळी व्यक्त केले. जयंतीत काहीतरी वाद आहे असे काही समोर आले तर हे प्रकरण पवारांना महागात पडणार असल्याचा इशाराच मी देतो अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. अहिल्यादेवींची जयंती म्हणजे राजकारणाचा अड्डा वाटतो का रे? तुम्हाला जयंती साजरी करायची असेल तर बारामतीत करा.

बारामतीतील अहिल्यादेवींच्या नावाने असलेल्या गार्डनमध्ये पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. यावेळी त्यांनी जमलेल्या लोकांना आवाहन करत महाराष्ट्रातील सर्व पोरांना आवाहन करतो की पवारांचे षडयंत्र जागीच ठेचून काढा अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.