Solapur : सोलापूर दगडफेक प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल, वादग्रस्त भाषण करणाऱ्यांवर कारवाई होणार का?

मिळालेल्या माहितीनुसार  मोर्चाच्या पूर्वी भाजप आमदार नितेश राणे, आमदार टी राजा सिंग  या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. धार्मिक तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याबाबात ही नोटीस होती. सभेदरम्यान नितेश राणे आणि टी राजा सिंग यांनी कोणताही आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांची तपासणी करून रीतसर कारवाई केली जाईल

Solapur : सोलापूर दगडफेक प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल, वादग्रस्त भाषण करणाऱ्यांवर कारवाई होणार का?
नितेश राणे
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 07, 2024 | 11:22 AM

सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur Stone Planting)  हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर 15 अज्ञातांविरोधात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल हिंदू जनआक्रोश मोर्चा दरम्यान मधला मारुती चौकात दोन गटात दगडफेक झाली. काल पोलिसांनी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली. वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा आणि लव्ह जिहाद कायदा आमलात आणावा यामागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात  आमदार नितेश राणे आणि आमदार टी. राजा हे देखील सहभागी झाले होते. भाषणामध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती. ही भाषणं तपासून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

एमआयएमचे शहराध्यक्ष फारुक शाबजी यांची कारवाईची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार  मोर्चाच्या पूर्वी भाजप आमदार नितेश राणे, आमदार टी राजा सिंग  या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. धार्मिक तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याबाबात ही नोटीस होती. सभेदरम्यान नितेश राणे आणि टी राजा सिंग यांनी कोणताही आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांची तपासणी करून रीतसर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  या मागणीचे निवेदन देणार असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे शहराध्यक्ष फारुक शाबजी यांनी दिली आहे. याशिवाय काल झालेल्या दगडफेकीनंतर आज दुकानं आणि व्यव्हार सुरळीत सुरू झाले आहेत.

 

काय म्हणाले होते नितेश राणे ?

वक्फ कायदा हा केवळ आपल्या देशात आहे, असा कायदा कोणत्याही इतर समाजासाठी नाही, इतकंच काय कुठल्याही इस्लामिक देशात हा कायदा नाही. आपल्या देशात जेवढी जमीन रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाने घेऊन ठेवली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकची जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फची आहे. जिथे अशी जमीन वक्फची म्हणून मागायला येतील तिथे तुम्ही विरोध करून उभे राहिला तर राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या मागे राहील असं नितेश राणे म्हणाले.