अखेर कोरोनाचा शिरकाव, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोना रुग्णाचा मृत्यू; तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती काय?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून देशात नोंदवलेल्या संसर्गामध्ये घट होत आहे, मंगळवारी 572 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. ताज्या प्रकरणांमुळे देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 4,565 झाली आहे.

अखेर कोरोनाचा शिरकाव, महाराष्ट्रातील 'या' शहरात कोरोना रुग्णाचा मृत्यू; तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती काय?
कोरोना अपडेट Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 1:16 PM

सोलापूर : देशासह राज्यात कोरोनाची (Corona JN 1 Update) आकडेवारी वाढत चाललेली आहे. जवळपास दिड वर्षानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 31 डिसेंबर रोजी 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मुत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार  रुग्णाला कोरोनासह रक्तदाब, मधुमेहचा देखील होता त्रास तसेच बायपास सर्जरी देखील झालेली होती.

खोकला आणि ताप असल्याने केली होती चाचणी

काही दिवसापूर्वी ताप आणि खोकला असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णाची कोविड चाचणी पॉसिटीव्ह आली होती. दरम्यान जे. एन. 1 व्हेरियंटचा हा रुग्ण होता की नाही यासंदर्भात अद्याप अहवाल आलेला नसल्याची प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांची माहिती. दिलासादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या रुग्णच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, तसेच लोकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन.  कोरोनाचे ज्यांना लक्षण आहेत अशा रुग्णांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. राज्यात काल मंगळवारी 105 कोरोना बाधीतांची नोंद झाली. यापैकी 16 प्रकरणं कोरोनाचा उप प्रकार JN.1 संबंधीत होते.

नवीन कोरोना बाधीतांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे या व्हेरीयंटचा धोका हा या आधी आलेल्या कोरोना इतका धोकादायक नसल्याचेही काही आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र नागरिकांनी मास्क वापणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

हे सुद्धा वाचा

लोकांमध्ये चिंतेचे वातावरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून देशात नोंदवलेल्या संसर्गामध्ये घट होत आहे, मंगळवारी 572 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. ताज्या प्रकरणांमुळे देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 4,565 झाली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 24 तासांच्या कालावधीत, कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एक, दोन लोकांचा संसर्ग झाला. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटींहून अधिक आहे आणि राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने नवीन प्रकार, JN.1 ला त्याचा वेगाने वाढणारा प्रसार पाहता एक वेगळा उप प्रकार म्हणून वर्गीकृत केले, तसेच ते जागतिक सार्वजनिक आरोग्य धोक्यात असल्याचे सांगितले. मंगळवारी, भारतात JN.1 प्रकारासह कोविड-19 चे एकूण 312 प्रकरणे नोंदवली, त्यापैकी सुमारे 47 टक्के प्रकरणे केरळमध्ये नोंदली गेली.  केरळ (147), गोवा (51), गुजरात (34), महाराष्ट्र (26), तामिळनाडू (22), दिल्ली (16), कर्नाटक (8), राजस्थान (5), तेलंगणा (2) आणि ओडिशा यांचा समावेश आहे.  डिसेंबरमध्ये, JN.1 ची उपस्थिती असलेली 279 कोविड प्रकरणे होती.

Non Stop LIVE Update
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.