Solapur Math: ‘मंदिर हम उडा देंगे’, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूंचा मठ उडवून देण्याची धमकी, संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Solapur Math Threat: सोलापूरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूंचा श्री.श्री.सद्गुरू बसवारुढ महास्वामींचा मठ उडवून देण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीत या आशयाची चिठ्ठी ठेवणारी संशयित महिला कैद झाली आहे.

Basavarudha Mahaswami Math: सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूंचा श्री.श्री.सद्गुरू बसवारुढ महास्वामींचा मठ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीची चिठ्ठी मठाच्या परिसरात टाकणारी संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. महिलेने या मठात धमकीची चिठ्ठी टाकली आहे. संबंधित महिलेने काही राजकीय पुढाऱ्यांसह मुस्लिम समाजातील अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. शहरातील नामवंत असणाऱ्या मठाला अशा पद्धतीची उघडपणे धमकी देण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या मठाला तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या घटनेने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणात पुढील तपास करत आहेत.
‘मंदिर हम उडा देंगे’
सोलापूर शहराच्या कस्तुरबा नगरात सदरचा मठ आहे. एका महिलेने दोन पानांची चिठ्ठी मठाच्या परिसरात टाकली आहे. ‘मंदिर हम उडा देंगे’ असा चिठ्ठीत उल्लेख करण्यात आला आहे. 52 वर्षे जुन्या मठ आणि मंदिराला अशा पद्धतीची धमकी आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. धमकीची चिठ्ठी मठाच्या परिसरात टाकणारी संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारा पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सदर मठातील मठाधिपती श्री. सदगुरू बसवारूढ महास्वामी हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गुरु म्हणून ख्याती आहे.
महिलेला एक दिवसांची पोलीस कोठडी
शहरातील नामवंत असणाऱ्या मठाला अशा पद्धतीची उघडपणे धमकी देण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सदरच्या मठाला पोलीस संरक्षण देण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित महिलेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेला न्यायालयासमोर हजर केले असता, तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मेहरुनिस्सा लाडलेसाब शेख असे या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. मानसिक विकृतीतून तिने हे कृत्य केल्याचे मानले जात आहे. मठातील लोकांच्या हाती चिठ्ठी पडली आणि त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.