Solapur Rain: सोसाट्याच्या वाऱ्यासह सोलापुरात मुसळधार! अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी धास्तावले

| Updated on: Apr 03, 2022 | 9:40 PM

Video Solapur Rains : सोलापुरात झालेल्या या अवकाळी पावसामुळे काढणीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरीही धास्तावले आहे. हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावण्याची भीती अवकाळी पावसाच्या येण्यानं आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

Solapur Rain: सोसाट्याच्या वाऱ्यासह सोलापुरात मुसळधार! अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी धास्तावले
सोलापुरात मुसळधार पावसाची हजेरी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सोलापूर : एकीकडे राज्यात तापमान (Heat in Maharashtra) वाढलंय. तर दुसरीकडे सोलापुरात वादळी वाऱ्यासह (Unseasonal Rain in Solapur) जोरदार पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहराजवळच्या कुंभारी गावावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसानं सगळ्यांचीच तारांबळ उडवली होती. सोलापुरात झालेल्या या अवकाळी पावसामुळे काढणीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरीही धास्तावले आहे. हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावण्याची भीती अवकाळी पावसाच्या येण्यानं आता शेतकऱ्यांना (Farmers in Maharashtra) लागून राहिली आहे. वाढलेल्या तापमानात अचानक पाऊस झाल्यानं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. यामुळे सोलापूर शहरातील नागरीक सुखावले आहे. दरम्यान, हायवेवर मात्र अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडवली आहे.

पाहा व्हिडीओ :

कुठं कुठं पावसाची हजेरी?

सोलापूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, रात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह कुंभारी आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेली पिकं नासण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

कुंभारीसोबत सोलापूर अक्कलकोट मार्गावरही पावसानं हजेरी लावली. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातही पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे द्राक्ष पिकं, काढणीला आलेला कांदा, काढलेली ज्वारी या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी हवालदिल झाले आहेत.

उस्मानाबादेतही अवकाळी पावसाची हजेरी

उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. लोहारा तालुक्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने ज्वारी पिकाचे नुकसान होण्याची शक्यताय. भर उन्हाळ्यात पाऊस पडल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. वातावरणातील अनियमित बदलाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार बसत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत.

इतर बातम्या :

मालेगावातील सटाणा रोडचा डेंजर झोन, एकाच ठिकाणी 3 दिवसात 3 अपघात, अपघाताची दृश्य CCTV त कैद

Akola: जेव्हा मोठ्या बहिणीला छोटेपणीच आई व्हावं लागतं! का? आईला परीक्षा देता यावी म्हणून…

Ajit Pawar : सरळ देत नसतील तर बोट वाकडं करावं लागतं, टनामागे 10 रुपये देण्यावरून अजित पवारांचा कारखान्यांना इशारा

Video : मालेगावातील ब्लॅक स्पॉट, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद