‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता आरपारची भूमिका; मुंबईवर बैलगाडी मोर्चा धडकणार…

किसान सभेचं लाल वादळ, जुनी पेन्शन लागू करण्यासाठी एकच मिशन जुनी पेन्शन असा आवाज देत सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनानंतर आता बैलगाडीसह शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडकणार आहेत.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता आरपारची भूमिका; मुंबईवर बैलगाडी मोर्चा धडकणार...
| Edited By: | Updated on: Mar 14, 2023 | 10:50 PM

सोलापूर : राज्यात एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना कष्टकरी, शेतकीरी, कामगार आणि शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मोर्चाचे अस्त्र बाहेर काढले आहे.नाशिक-मुंबई हा किसान सभेचा लाँग मार्च काढला असतानाच आता एक दुसरा मोर्चा मुंबईवर बैलगाडींसह धडकणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 7/12 उताऱ्यावर एमआयडीसी असा पडलेला शेरा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी शेतकरी बैलगाडी आता मार्गस्थ झाले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे नियोजित एमआयडीसी होणार असून शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर एमआयडीसी अशी नोंद झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीला विरोध करत मंद्रूप येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन एमआयडीसी हा शेरा रद्द होईल असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते.

मात्र अद्याप सातबारा उताऱ्यावरील नोंद रद्द न झाल्याने ती रद्द होण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर शेतकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहेत.त्यासाठी ते बैलगाडीने मुंबईकडे शेतकरी मार्गस्थ झाले आहेत.

मंद्रूपहुन मुंबईकडे निघालेला शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा सोलापूर शहरात पोहोचला असून टप्प्याटप्प्याने हा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे.

त्याआधीच किसान सभेनेही लाँग मार्च काढल्याने सरकार आचा पेचात सापडले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि कर्मचाऱ्यांनीही आंदोलन पुकारल्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पालकमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी अश्वासन देऊनही 7/12 उताऱ्यावरील एमआयडीसी हा शेरा रद्द झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.