ISRO : ‘वालचंदनगर कंपनीकडून ‘विंड टनेल’ चे तिसरे उपकरण इस्त्रोकडे मार्गस्थ.;अवकाशातील पर्यावरणीय स्थितीचा अभ्यास करणार

| Updated on: Mar 17, 2022 | 9:54 AM

रॉकेट अवकाशामध्ये उड्डाण केल्यानंतर वातावरणातील दाबाचा यानाच्या उपकरणावरती परिणाम होत असतो. याचा अभ्यास करण्यासाठी विक्रम साराभई स्पेस सेंटरने ट्रायसोनिक विंड टनेल विकसित केले आहे,

ISRO : वालचंदनगर कंपनीकडून विंड टनेल चे तिसरे उपकरण इस्त्रोकडे मार्गस्थ.;अवकाशातील पर्यावरणीय स्थितीचा अभ्यास करणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

इंदापूर- इस्त्रोने (ISRO)अवकाशामध्ये सोडलेल्या यानातील उपकरणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या स्वदेशी सोनिक विंड टनेलच्या (wind tunnel) “प्लेनम शेल या उपकरणाची वालचंदनगर कंपनीने (Walchandnagar Company) यशस्वी निर्मिती केली आहे. रॉकेट अवकाशामध्ये उड्डाण केल्यानंतर वातावरणातील दाबाचा यानाच्या उपकरणावरती परिणाम होत असतो. याचा अभ्यास करण्यासाठी विक्रम साराभई स्पेस सेंटरने ट्रायसोनिक विंड टनेल विकसित केले आहे, विंड टनेलचा उपयोग अवकाशातील पर्यावरणीय परिस्थितीचे अध्ययन करण्यासाठी होतो आहे.विंड टनेल देशामध्ये पहिल्यांदाच तयार करण्यात येत असून याच्यामध्ये 11 महत्त्वाच्या उपकरणाचा समावेश आहेत यातील 5 उपकरणे इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील कंपनीने तयार करीत आहे.

महत्त्वाच्या उपकरणाचा समावेश

विक्रम साराभई स्पेस सेंटर ही संस्था टाटा प्रोजेक्ट व वालचंदनगर कंपनीच्या मदतीने विंड टनेल देशामध्ये पहिल्यांदाच तयार करण्यात येत असून याच्यामध्ये 11 महत्त्वाच्या उपकरणाचा समावेश आहेत यातील 5 उपकरणे इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील कंपनीने तयार करीत आहे. यातील विंड टनेलच्या “प्लेनम शेल” या तिसऱ्या उपकरणाची यशस्वी निर्मिती केली आहे. विंड टनेलच्या उपकरणाचे विक्रम साराभई स्पेस सेंटरकडे हस्तांतर करण्यात आले. टाटा प्रोजेक्ट व विक्रम साराभई स्पेस सेंटरने वालचंदनगर कंपनीचे कौतुक केले, विंड टनेलच्या स्वदेशी प्लेनम शेल निर्मितीमध्ये पंकज पवार, राहुल दोशी, अमित शिरोळकर, श्रीधर पनाडा, नितीन खराडे, चंद्रशेखर विचारे, अतुल पुजारी, संभाजी शेलार वालचंदनगर कंपनीमधील अधिकारी व कामगारांचा महत्वाचा सहभाग आहे.

Kharghar परिसरात डोंगरात वणवा भडकला, अग्निशमन दल घटनास्थळी, कारण अस्पष्ट

स्टाईल आयकॉन Kriti Sanon चे हटके स्टाईल टॉप 5 फोटो, तुम्हालाही तिची स्टाईल कॉपी करावीशी वाटेल!

Worli Koliwada येथे होळीचा उत्साह, Amit Thackeray यांच्या हस्ते होलिकादहन