AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक: कोल्हापूरातील जयाप्रभा स्टुडिओची विक्री, ज्यांनी आंदोलन केले त्याच नेत्याच्या मुलांचा सहभाग

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकिची कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जागा दोन वर्षांपूर्वी विक्री केल्याचे उघड झाले आहे. लतादीदींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओ परिसरात उभा करण्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती ही समोर आली आहे.

धक्कादायक: कोल्हापूरातील जयाप्रभा स्टुडिओची विक्री, ज्यांनी आंदोलन केले त्याच नेत्याच्या मुलांचा सहभाग
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Feb 12, 2022 | 7:00 PM
Share

कोल्हापूर: कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेची दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याची माहिती आज समोर आली आहे. या प्रकारामुळे कोल्हापुरातील (Kolhapur) कलाप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या मालकीच्या या ऐतिहासिक जागेची विक्री (Sale of land) होऊ नये यासाठी कोल्हापूरकर लढा देत होते. मात्र आज ही जागा विकली गेल्याचे माहिती समोह आली आल्यानंतर आता कोल्हापूरात नव्या वादाला तोंड फुटल आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओमध्ये उभा करण्याच्या हालचाली सुरू असतानाच स्टुडिओची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकिची कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जागा दोन वर्षांपूर्वी विक्री केल्याचे उघड झाले आहे. लतादीदींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओ परिसरात उभा करण्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. 15 फेब्रुवारी 2020 रोजी 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार या जागेचा झाला आहे.

लता मंगेशकर यांच्याविरोधात मोर्चा

महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी या फार्मने ही जागा खरेदी केली आहे. विशेष म्हणजे याच्या भागीदारांमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या रुतुराज आणि पुष्कराज या दोन्ही मुलांची नाव आहेत. हेरिटेज वास्तूंमध्ये समावेश असलेल्या जयप्रभा स्टुडिओ मूळ स्वरूपात राहावा यासाठी कोल्हापूरकरांनी प्रसंगी लता मंगेशकर यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. कोल्हापूरकरांनी हातात पायताण घेऊन केलेल्या आंदोलनामुळे लतादीदी कायमच्या कोल्हापूरपासून दुरावल्या होत्या. याच जयाप्रभा स्टुडियओबाबत न्यायालयातही लढाई सुरू असतानाच जयप्रभा स्टुडिओच्या जागेची विक्री झाल्याचे समोर आल्याने कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे.

कोल्हापूरवर दरोडा

जयप्रभा स्टुडिओची विक्री म्हणजे कोल्हापूरवर दरोडा असून हेरिटेजमधील वास्तू विकली गेलीच कशी असा सवाल आता नगरसेवक भूपाल शेटे यांनी उपस्थित केला आहे. याबाबतीत लवकरच जनहित याचिका देखील दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहेत.

जयप्रभा स्टुडिओचा इतिहास

कलेचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती व्हावी यासाठी राजाराम महाराजांनी 1934 मध्ये त्याकाळी शहरापासून बाहेर असलेली 13 एकर जागा भालजी पेंढारकर यांना दिली. भालजी पेंढारकर यांनीही चित्रपट निर्मितीसाठी या जागेचा वापर करत त्या ठिकाणी अनेक यशस्वी चित्रपट केले. मात्र काही काळानंतर भालजी पेंढारकर कर्जबाजारी झाले आणि त्यांनी ही जागा लता मंगेशकर यांना दिली.

लता मंगेशकर यांनीही भालजी पेंढारकर जिवंत असेपर्यंत याचा कला क्षेत्रासाठी वापर केला. त्यानंतर मात्र यातील काही जागेवर मोठ्या इमारती उभे राहू लागल्या. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओचा असलेली शहर परिसरातील जागाही धोक्यात आली.

कोल्हापूरात पायताण आंदोलन

जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज म्हणून जतन करावा यासाठी कोल्हापुरात मोठा लढा उभा राहिला होता. त्यावेळी कोल्हापूरकरांनी लतादीदींविरोधात पायताण आंदोलन पुकारले होते. जयप्रभा स्टुडिओ वाचवा म्हणून आंदोलन आणि न्यायालयीन लढा दिला गेला होता, हे सगळं सुरु असतानाच मात्र ही जागा विकली गेल्याचे समोर आल्यानं कोल्हापूरकरांमधून आता संताप व्यक्त होत आहे.

खरेदीत आमदारांच्या मुलांचा सहभाग

जयप्रभा स्टुडिओ जागा विक्री प्रकरणाला आता राजकीय रंगदेखील मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्या कंपनीने ही जागा खरेदी केली आहे त्या कंपनीत भागीदार म्हणून माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या ऋतुराज आणि पुष्कराज या दोन्ही मुलांचा समावेश आहे. जयप्रभा स्टुडिओच्या आंदोलनात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सहभाग घेतला होता आता त्यांच्याच मुलांनी ही जागा खरेदी केल्याने कलाप्रेमी कोल्हापूर कलाकारांना हे धक्कादायक आहे.

माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र याबाबत सावध प्रतिक्रिया दिलीय.. मुलांनी केलेल्या व्यवहाराची आपल्याला माहिती नाही.. एखादी जागा कायदेशीरपणे विकत घेण्याचा अधिकार आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे याचा समर्थनच केले. तर आपल्याला कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे सांगत त्यांनी थेट पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावरच निशाणा साधला आहे..

एकूणच जयप्रभा स्टुडिओची वादातील जागा विकली गेल्या समोर होता कलाप्रेमी मध्ये संतापाची लाट दिसते तर दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचा यातील सहभाग आम्ही आता याला राजकीय रंग देखील येताना दिसतोय… त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ वरून कोल्हापुरातील वातावरण पुन्हा एकदा तापणार हे निश्चित.

संबंधित बातम्या

‘इंडियन आयडल मराठी’कडून भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली, लतादिदींच्या अजरामर गीतांचा नजराणा

अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार, ‘सिंगल’मधून हास्याचा धमाका करणार

Mitali Mayekar: हवा में उडता जायें… पांढरा शुभ्र लेहेंगा अन् निखळ हास्य; मिताली मयेकरचा बोल्ड अँड ब्युटिफूल अंदाज पाहिला का?

Follow Us
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?