AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरचं उपमहापौरपद शापित, ज्यांनी पद भूषवलं त्या सर्वांची अवस्था काय?

अहमदनगर: भूत, पिशाच्च, शकून – अपशकून, जादूटोणा आणि शापित हे शब्द आपण ऐकतो. मात्र शापित या शब्दानं अहमदनगरला भल्या भल्यांच्या काळजात धडकी भरवली आहे. अहमदनगर मनपाचं उपमहापौर शापित असल्याच्या चर्चांनी ऐन निवडणुकीत जोर धरला आहे. आतापर्यंत सात जणांनी मनपाचं उपमहापौरपद भूषवलं, मात्र ते मनपातून हद्दपार झाले आहेत. नेमकं काय आहे रहस्य? उपमहापौरपद शापित असल्याची चर्चा […]

नगरचं उपमहापौरपद शापित, ज्यांनी पद भूषवलं त्या सर्वांची अवस्था काय?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

अहमदनगर: भूत, पिशाच्च, शकून – अपशकून, जादूटोणा आणि शापित हे शब्द आपण ऐकतो. मात्र शापित या शब्दानं अहमदनगरला भल्या भल्यांच्या काळजात धडकी भरवली आहे. अहमदनगर मनपाचं उपमहापौर शापित असल्याच्या चर्चांनी ऐन निवडणुकीत जोर धरला आहे. आतापर्यंत सात जणांनी मनपाचं उपमहापौरपद भूषवलं, मात्र ते मनपातून हद्दपार झाले आहेत. नेमकं काय आहे रहस्य?

उपमहापौरपद शापित असल्याची चर्चा नगरमध्ये आहे. याला कारणही असंच आहे. नगर मनपाचं उपमहापौरपद सात जणांनी भूषवलं. मात्र सातही माजी उपमहापौरांमागे राजकीय साडेसाती लागली. सातही माजी उपमहापौर पालिकेतून हद्दपार झाले आहेत. त्यामुळं उपमहापौरपद शापित असल्याचा ठपका बसला आहे.

अहमदनगर मनपाची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत  मोठी चुरस आहे. नगरसेवकांसाठी सर्वांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. काहींचा डोळा महापौरपदावर आहे, मात्र उपमहापौरपद म्हटलं की अनेकजण कानाला हात लावतात. उपमहापौर मनपाच्या सत्ताकारणातील मानाचं पद. मात्र हे पद शापित असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. ऐन निवडणुकीत शापित उपमहापौर परवलीचा शब्द झाला आहे.

अहमदनगर मनपाची स्थापना 2003 सालची. आतापर्यंत सात जणांनी उपमहापौरपद भूषवलं. मात्र हे सातही उपमहापौर पालिकेतून बाद झाले आहेत.  सातही जणांची माजी शब्दावर बोळवण झाली. उपमहापौर झाल्यावर सातही जणांचा मनपातील पत्ता कट झाला आहे.

शापित उपमहापौर कोण?

1) ज्ञानेश्वर सदाशिव खांडरे

2)दीपक सूळ

3)हाजी नजीर मोहोम्मद शेख

4)गितांजली सुनिल काळे

5)सुवर्णा संदिप कोतकर

6)श्रीपाद छिंदम

7)अनिल वसंत बोरुडे  

अहमदनगर मनपाच्या सात जणांना शापित उपमहापौर पदाचा शिक्का बसलाय. यात भाजपाच्या तीन, राष्ट्रवादीचा एक, काँग्रेसचे दोन आणि एका शिवसैनिकाचा समावेश आहे. उपमहापौरपद भूषवल्यानंतर सातही जणांच्या मागं राजकीय साडेसाती लागली आहे. सातही जणांच्या नशिबी राजकीय वनवास आला आहे. काहींनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र पदरी निराशाच पडली.

सात उपमहापौरांपैकी छिंदम आणि सुवर्णा कोतकरचे सर्वाधिक ग्रह फिरलेत. छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा छिंदम हद्दपार झाला आहे, तर शिवसैनिकांच्या हत्याकांडात सुवर्णा कोतकरवर कारवाईची टांगती तलवार आहे.  छिंदम पत्नीसह यंदा पुन्हा नशीब आजमावतोय, तर कोतकर फरार आहे.

शापित उपमहापौराला पुष्टी देणार्‍या अनेक घटना आहेत. अनिल बोरुडे हे कट्टर शिवसैनिक. गेल्या पंधरा वर्षांपासून ते सेनेचे नगरसेवक होते. छिंदमची उपमहापौरपदावरुन गच्छंती झाल्यावर त्यांनी उपमहापौरपद भूषवलं, मात्र यंदा प्रभागरचनेत त्यांच्या वार्डाची मोडतोड झाली. सुरक्षित मतदारसंघ नसल्यानं त्यांनी आपली तलवार म्यान केली आणि दुसर्‍या प्रभागात पत्नीला उमेदवारी दिली.

सत्ताकारणात खुर्ची महत्वाचे आसते. भले ती महापौरपदाची असो नाहीतर उपमहापौर पदाची. उपमहापौरपद हे तर मनपा सत्ताकारणातील मानाचं पद आहे. मात्र शापितचा ठपका बसल्यानं अनेकजण उपमहापौरपदाच्या खुर्चीपासून दूर पळत आहेत. त्यामुळं काहींचा डोळा जरी महापौरपदावर असला तरी नगरकरांचं लक्ष मात्र उपमहापौरपदाकडं लागलंय.

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत