आमदार रोहित पवार यांच्या पुणे MPSC आंदोलनात फूट, दोन गट पडले….

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरु असलेल्या एमपीएमसी आंदोलनात दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांनी या प्रकरणात राजीनाम द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आता या आंदोलनात दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे.

आमदार रोहित पवार यांच्या पुणे MPSC आंदोलनात फूट, दोन गट पडले....
ROHIT PAWAR
| Updated on: Sep 23, 2026 | 6:26 PM

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरु असलेल्या एमपीएमसी आंदोलनात दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे. रोहित पवार यांनी गेली अनेक दिवस पुण्यातील MPSC च्या परीक्षा प्रकरण लावून धरले आहे. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांनी या प्रकरणात राजीनाम द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आता या आंदोलनात दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी लावून धरली आहे. आता MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी येत्या 26 तारखेला पुण्यात विद्यार्थ्याचे आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, गणेशोत्सव असल्याने या वेळेत आंदोलनास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

आंदोलनात राजकारण नको

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता दोन गट पडल्याचे म्हटले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी आंदोलन पुकारल्यानंतर काही विद्यार्थी नाराज झाल्याचे म्हटले जात आहेत. रोहित पवार याचं आंदोलन हे एका राजकीय पक्षाचे आंदोलन असून विद्यार्थ्यांचे आंदोलन नसल्याचा गंभीर आरोप निखील पाटील या विद्यार्थ्याने केला आहे. रोहित पवार 26 तारखेला जे आंदोलन करत आहेत ते आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट असल्याचा आरोप पाटील याने केला आहे.
विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला जावं की नाही. हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, मात्र हे आंदोलन विद्यार्थ्याचं नसून राजकीय पक्षाचं असल्याचा आरोप निखिल पाटील यांनी केला आहे. या सरकारने तुकाराम मुंडे यांना एफडीएपदी बसवले आहे, याची भीती रोहित पवारांना आहे का ?. बारामती ॲग्रोमधील सगळे घोळ बाहेर येऊ नये त्यामुळे तुकाराम मुंढे यांना एफडीएच्या पदावरून बाजूला करायचे आहे का?असा सवालही निखिल पाटील याने केला आहे.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us