Hingoli : एसटी कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, मुंबईवरुन परतलेल्या कर्मचाऱ्याची हिंगोलीत आत्महत्या

| Updated on: Apr 11, 2022 | 10:42 PM

हिंगोलीमधील बडतर्फ एस टी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केली घटना घडली आहे

Hingoli : एसटी कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, मुंबईवरुन परतलेल्या कर्मचाऱ्याची हिंगोलीत आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

हिंगोली : एसटी (ST) संपात अनेकांनी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. एसटी कर्मचाऱ्यांनी (ST employee) उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं काय, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. अशातच एक धक्कादायक बातमी हिंगोलीतून (Hingoli) समोर आली आहे. एका बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. अशोक कळंबे असं आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. वसमत डेपोमध्ये ते कार्यरत होतं. दोन दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. स्वतःच्या घराच्या खिडकीला कपड्याच्या साहाय्यानं गळफास या कर्मचाऱ्यानं आपलं आयुष्य संपवलंय. आणखी एका एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या एसटी कर्मचाऱ्यानं नेमकी आत्महत्या का केली, याची माहिती मिळू शकलेली नाही.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

एसटी संप हा मुळातच विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी करण्यात आला होता. मात्र ही मागणी सरकारनं फेटाळून लावली होती. मात्र संपातील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. गुरुवारी न्यायालयानं संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू 22 एप्रिल पर्यंतचा वेळ दिला होता. सोबत ग्रॅच्युएटी, पेन्शन, पीएफ या मागण्याही मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र विलीनीकरणाची  प्रमुख मागणी मान्य करणं शक्य नसल्यानं सरकारनं न्यायालयातही स्पष्ट केलं होतं. त्यामुळे संपातील कर्मचारी संपातले आहेत.

परिवहन मंत्री काय म्हणतायेत?

कोविड महामारीमुळे आधीच एसटीची चाके थांबली होती, त्यात कामगारांच्या संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र, सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल. संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेला जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी दिलासादायक माहिती परिहवन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज दिली. माननीय उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल, 2022 पर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरु होण्यासाठी परिवहन मंत्री परब यांनी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संपामुळे गेले 5 महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी लागणार आहे. दरम्यान, हिंगलीत एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानं हा संप कर्मचाऱ्यांच्या जीवाशी येत असल्याचं बोललं जातंय. 

इतर बातम्या

वादळी पावसात द्राक्षबाग जमीनदोस्त; सोलापुरात शेतकरी पावसामुळे हवालदिल; शाळेचेही पत्रे उडाले

Mumbai : मुंबईला मिळाली एक नवी ओळख! जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून मुंबईची निवड

Special Report | शिवसेना गृहखात्यावर आणि कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांवर नाराज? – Tv9