Mumbai : मुंबईला मिळाली एक नवी ओळख! जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून मुंबईची निवड

मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देतानाच मुंबईतील पर्यावरणाची जोपासना करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावण विषयक कामांची दखल आता थेट संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने घेतली आहे. या संस्थेने 'वृक्ष नगरी' अर्थात 'Tree City' चा 'वर्ष 2021' साठीचा बहुमान आपल्या मुंबईला घोषित केला आहे.

Mumbai : मुंबईला मिळाली एक नवी ओळख! जागतिक स्तरावर 'वृक्ष नगरी' म्हणून मुंबईची निवड
आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 10:13 PM

मुंबई : मुंबईकर (Mumbai) नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देतानाच मुंबईतील पर्यावरणाची जोपासना करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावण विषयक कामांची दखल आता थेट संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने घेतली आहे. या संस्थेने ‘वृक्ष नगरी’ अर्थात ‘Tree City’ चा ‘वर्ष 2021’ साठीचा बहुमान आपल्या मुंबईला घोषित केला आहे. हा असा बहुमान मिळवणारे मुंबई हे भारतातील (India) दुसरे शहर ठरले आहे. या गौरवामुळे ‘स्वप्न नगरी’ अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहराला आता ‘वृक्ष नगरी’ अशी एक नवी ओळख मिळाली आहे. जागतिक स्तरावरील या गौरवाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज संपन्न झालेल्या एका विशेष बैठकीत दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीतील ‘अरबोर डे फाऊंडेशन’ यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मान पत्राची प्रत दिली आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक कामांचे कौतुक केले. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांची उपस्थित होते.

मुंबई शहराचे अभिनंदन

‘अरबर डे फाऊंडेशन’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन लेंब यांनी या मुंबई शहराच्या बहुमानानिमित्त लिहिलेल्या विशेष पत्रात मुंबई शहराचे अभिनंदन केले आहे. तसेच मुंबई शहर हे आता शहरी आणि सामुदायिक वनीकरणात आघाडीवर असलेल्या महत्त्वाच्या जागतिक ‘नेटवर्क’मध्ये सहभागी झाले आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा दर्जा मिळवल्याबद्दल त्यांनी मुंबई शहराचे आणि पर्यायाने मुंबईकरांचे अभिनंदन केले आहे.

शहराला मोठा बहुमान

मुंबई शहराच्या या बहुमानाने बद्दल अधिक माहिती देताना उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमितपणे करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची घेण्यात येणारी शास्त्रशुद्ध निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप अशा विविध मानकांच्या आधारे जगभरातील शहरांचे मूल्यमापन करण्यात येऊन मुंबईची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भारतातील केवळ हैदराबाद या एकाच शहराला हा बहुमान लाभला आहे. त्यामुळे ‘वृक्ष नगरी’चा बहुमान मिळवणारे मुंबई हे देशातील दुसरे शहर ठरले आहे अशीही माहिती परदेशी यांनी यानिमित्ताने दिली आहे. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज संपन्न झालेल्या एका विशेष बैठकीत दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीतील ‘अरबोर डे फाऊंडेशन’ यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मान पत्राची प्रत दिली

इतर बातम्या

Special Report | शिवसेना गृहखात्यावर आणि कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांवर नाराज? – Tv9

काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु

Special Report | Udayanraje यांच्याबद्दल Gunratna Sadavarte नेमकं काय बोलले होते? -Tv9

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.