Konkan Railway: वांद्रे टर्मिनस वरून वसई रोड रेल्वे स्थानक मार्गे कोकणात जाणारी ट्रेन सुरु करा; मनसेची मागणी

| Updated on: Jul 17, 2022 | 11:29 PM

मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नयन प्रदीप कदम यांनी हे पत्र पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना लिहिले आहे. या संदर्भात स्वतः पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन ही मागणी त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे नयन कदम यांनी सांगितले. पश्चिम रेल्वे मार्गावर कोकणात जाण्याकरिता ट्रेन सुरू केल्यास या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे नयन कदम यांचे म्हणणे आहे.

Konkan Railway: वांद्रे टर्मिनस वरून वसई रोड रेल्वे स्थानक मार्गे कोकणात जाणारी ट्रेन सुरु करा; मनसेची मागणी
कोकण रेल्वे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : गणेशोत्सव(ganpati festival 2022) म्हणजे कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. गणपती करिता कोकणात जाण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. तीन-चार महिने आधीपासूनच गणपती करिता गावी जाण्याकरिता कोकण रेल्वेचे(Konkan Railway) तिकीट बुकिंग केले जाते. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पश्चिम रेल्वे मार्गावरून थेट एक्सप्रेस मिळत नसल्याने येथील प्रवाशांना मध्य रेल्वे वरून कोकणात जाण्यासाठी ट्रेन पकडावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस(Bandra Terminus ) वरून वसई रोड रेल्वे स्थानक मार्गे कोकणात जाणारी ट्रेन सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेने(MNS) याबाबत पश्चिम रेल्वेला पत्र दिले आहे गणेशोत्सव काळात पश्चिम रेल्वे मार्गावरून विशेष ट्रेन उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील मनसेने या पत्राद्वारे केली आहे.

मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नयन प्रदीप कदम यांनी हे पत्र पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना लिहिले आहे. या संदर्भात स्वतः पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन ही मागणी त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे नयन कदम यांनी सांगितले. पश्चिम रेल्वे मार्गावर कोकणात जाण्याकरिता ट्रेन सुरू केल्यास या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे नयन कदम यांचे म्हणणे आहे.

काय आहे मनसेच्या पत्रात?

कोकण रेल्वमार्गावरिल रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील बहुसंख्य चाकरमानी वांद्रे ते पालघर परिसरात रहात आहेत. त्यांना आपल्या गावी कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वे मार्गे कोकणात जाणाऱ्या ट्रेनचा गैरसोयीचा पर्याय आहे. बोरिवली ते पालघर मधील कोकणी चाकरमान्यांना मध्यरेल्वे वरून कोकण रेल्वमार्गे जाणारी ट्रेन पकडावयाची झाल्यास रात्री दोन वाजता उठून खाजगी वाहानाने छत्रपति शिवाजीमहाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला किंवा दादर येथे जावे लागते.

गोरगरीब चाकरमान्यांना रात्रीची शेवटची लोकल ट्रेन पकडून मध्यरेल्वेच्या उपरोक्त स्थानकांवर वास्तव्यास जावे लागते. गोरगरीब चाकरमान्यांना रात्रीची शेवटची लोकल ट्रेन पकडून मध्य रेल्वेच्या उपरोक्त स्थानकांवर वास्तव्यास जावे लागते. अशा वेळी लहानमुलं, महीला, आजारी प्रवाशी तसेच ज्येष्ठ नागरिक यांचे अतोनात हाल होऊन खूपच त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्ष्यात घेऊन मुंबई मधील पश्चिम मार्गावरील वांद्रे ट्रमिन्स वरून वसई रोड रेल्वे स्थानक मार्गे कोकणात जाणारी ट्रेन उपलब्ध व्हावी.

या साठी कांदिवली ते विरार परिसरात वास्तव्यास असणाऱ्या कोकणी चाकरमान्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे केलेल्या मागणीला अनुसरून मी आपणास विनंती करतो की वांद्रे येथून वसई रोड मार्गे कोकण रेल्वमार्गावर कोकणात जाणारी कायमस्वरूपी ट्रेन उपलब्ध करून द्यावी. तसेच मुंबई – गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आणि घाटरस्त्यावर अचानक कोसळणाऱ्या दरडी आणि इतर कारणांमुळे गैरसोयीचा आणि त्रासदायक होणारा प्रवास लक्ष्यात घेऊन आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांच्या सुखकारक प्रवासासाठी पश्चिम मार्गावरून (वांद्रे टर्मिनस वरून) जाणाऱ्या पुरेश्या प्रमाणत ट्रेन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.

पश्चिम रेल्वे परिसरातील उपनगरातील कोकणी चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी होणारा त्रास लक्ष्यात घेवून आपण आपल्या अधिकारांतर्गत लवकरात लवकर उपरोक्त मागणीवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेवून कोकणी चाकरमान्यांना • दिलासा द्यावा अशी विनंता पत्राद्वारे केली.