AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : मोठी बातमी! सरकारने तुकाराम मुंढेंचा निर्णय फिरवला, सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ

सुट्टे तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी फडणवीस यांना सांगितल्या. याच चर्चेनंतर व्यापाऱ्यांना सुटे तेल विकण्यासाठी एका वर्षाची मुदत देण्यात आली आहे.

Tukaram Mundhe : मोठी बातमी! सरकारने तुकाराम मुंढेंचा निर्णय फिरवला, सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ
tukaram mundhe loose edible oilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 4:39 PM
Share

Loose Oil Ban Rule : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील भेसळ कमी झाली आहे. खाद्यपदार्थातील भेसळ, निकृष्ट दर्जाचे जेवण आढळताच तुकाराम मुंढे थेट कारवाई करताना दिसत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सुट्ट्या तेलाची विक्री बंद केली. खाद्यतेलाची विक्री करताना तेलकंपन्यांना नियमांचे पालन करावे लागेल, असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक, व्यापारांना मोठा फटका बसत आहे, असा दावा केला जात होता. असे असतानाच आता राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय फिरवला आहे. सुट्टे खाद्यतेल विकण्यासाठी सरकारने एका वर्षाची मुदत दिली आहे.

सरकारने नेमका काय निर्णय घेतला?

सुट्टे तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी फडणवीस यांना सांगितल्या. याच चर्चेनंतर व्यापाऱ्यांना सुटे तेल विकण्यासाठी एका वर्षाची मुदत देण्यात आली आहे. मात्र यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच सर्वांना कायदा पाळावाच लागेल. या 1 वर्षात प्रत्येकाने आपल्या व्यवसायात अनुकूल बदल करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

सुट्ट्या तेलाच्या मुद्द्यावर बोलताना 2011 साली हा कायदा झाला. गुणवत्ता हा महत्वाचा निकष आहे. पण अनेक गरीब माणसं सुटे तेल घेतात. त्यामुळे कायदा आणि सामान्य माणूस यातून मार्ग काढला पाहिजे. कायद्याचे पालन करताना पारंपरिक व्यावसायिकांना काय बदल करावे लागतील याचा अभ्यास करण्यासाठी  समिती गठित करणार आहोत. एफडीए आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती असेल. आवश्यकता भासल्यास राज्य सरकार मदत करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल