ज्याची भीती तेच घडतंय, पुढच्या वर्षीही एल निनोचा धोका, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पाऊसाची..

राज्यात एल निनोचा प्रभाव बघायला मिळाला. राज्यात कोरडा दुष्काळ बघायला मिळतोय. सरकारकडून कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यातच 2027 मध्ये परिस्थिती अधिक गंभीर असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

ज्याची भीती तेच घडतंय, पुढच्या वर्षीही एल निनोचा धोका, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पाऊसाची..
El Nino
| Updated on: Sep 28, 2026 | 8:40 AM

राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. राज्य सरकारने दुष्काळाची पाहणी करून दुष्काळ जाहीर केला. अनेक ठिकाणी परिस्थिती विदारक आहे. पिके वाळून गेली. शेतकरी चिंतेत आहे. पाण्याची मोठी समस्या आहे. सुरूवातीपासूनच सांगितले जात होते की, मॉन्सूनच्या पावसावर एल निनोचा प्रभाव असेल. एक तर अतिप्रचंड पाऊस असेल किंवा कोरडा दुष्काळ असू शकतो. राज्यात पावसाने पाठ फिरवली. कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे. शेतकरी हवालदिल झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: विदर्भ आणि मराठवाड्यात जाऊन दुष्काळी भागाची पाहणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एल निनोचे संकट फक्त याच वर्षी आहे असे अजिबात नाही. पुढच्या वर्षीही एल निनोचा प्रभाव आगामी काळात आणखी वाढण्याची अंदाज आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पुढच्या वर्षीच्या पावसावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याचेच गांभीर्य ओळखून राज्य सरकारने 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी महत्वाची पाऊस उचलण्याचा निर्णय घेतला.

जुलै 2027 च्यापर्यंतची पाण्याची गरज याचा अंदाज आराखडा तयार करण्याचा सूचना दिल्या आहेत. धरणांमधील पाणी जुलै 2027 पर्यंत पिण्यासाठी आरक्षित ठेऊन उर्वरित पाण्याचा वापर उद्योग आणि रब्बी पिकांसाठी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पुढील काही दिवसात एल निनो अजून शिगेला पोहोचू शकतो. तज्ज्ञांनी याबाबत अत्यंत मोठा इशारा दिला.

जगभरातील तज्ज्ञांकडून मोठा इशारा दिला जात आहे. पॅसिफिक महासागरातील उष्णतेमुळे अल निनो तयार झाला. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम दिसत आहे. 2027 मध्येही एल निनोचे संकट असणार आहे. 2027 मध्ये एल निनोचे परिणाम अजून दिसून येतील. त्यावेळीसाठी सरकारकडून आताच नियोजन केले जात आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय असल्याने भारतात त्याचे परिणाम आता स्पष्ट दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us