AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्सल बंद, 5 हजारांचा दंड, शिवभोजन थाळीचे नियम बदलले; सरकारचा मोठा निर्णय!

प्राप्त माहितीनुसार सरकारने शिवभोजन योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. सर्व शासन निर्णय एकत्रित करून शासनाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहेत.

पार्सल बंद, 5 हजारांचा दंड, शिवभोजन थाळीचे नियम बदलले; सरकारचा मोठा निर्णय!
shivbhojan thaliImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 8:50 PM
Share

शिवभोजन थाळी ही तत्काळी उद्धव ठाकरे यांच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना होती. अजूनही ही योजना सुरूच आहे. अवघ्या दहा रुपयांत शिवभोजन थाळी मिळते. सामान्यांना कमी पैशात सकस जेवण मिळावे, हा या योजनेमागचा उद्देश आहे. दरम्यान, आता राज्य सरकारने शिवभोजन थाळीविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास रोज पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद सरकारने केली आहे. सोबतच प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सरकारने नेमका काय निर्णय घेतला?

प्राप्त माहितीनुसार सरकारने शिवभोजन योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. सर्व शासन निर्णय एकत्रित करून शासनाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहेत. सोबतच सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान शिवभोजन केंद्र चालू असणार आहे. शिवभोजन केंद्रातून पार्सल नेण्यास व बाहेरून पार्सल जेवण आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

…तर पाच हजार रुपयांचा दंड

दुसरीकडे शिवभोजन केंद्रात दररोज किमान 75 ते कमाल 200 जेवणाच्या थाळी दिल्या जाणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दररोज 5 हजार रुपये दंड आकारला जाईल, अशीही तरतूद करण्यात आलीय. प्रत्येकी 10 रुपयांत शिवभोजन थाळी आता मिळणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना