सहकारी साखर कारखान्यांबद्दल राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, पुनरुज्जीवनासाठी..
सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समिती गठीत. राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू राहावेत, यासाठी सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँकेकडून संयुक्त अभ्यास करण्यात येणार. याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समिती गठीत. राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू राहावेत, यासाठी सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँकेकडून संयुक्त अभ्यास करण्यात येणार. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती स्थापन करण्यास शासनाची मंजुरी. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती, आर्थिक अडचणी आणि कारखाने बंद पडण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास होणार. समितीमध्ये सहकार आयुक्त, राज्य सहकारी बँक, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींचा समावेश.
कारखान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर. ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत शिफारशी. ऊस शेतीमध्ये एआय, जीपीएस, ड्रोन आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ऊस बियाणे, मृदा आरोग्य, पीक फेरपालट आणि ऊस विकास कार्यक्रमाचा अभ्यास. साखर कारखान्यांना ऊर्जा संकुल म्हणून विकसित करण्यासाठी आराखडा तयार होणार.
दोन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलीत. समितीने दोन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल आणि शिफारशी शासनाला सादर कराव्यात, असे शासन निर्णयात नमूद
-साखर उद्योगातून अतिरिक्त उत्पन्नाचे नवे पर्याय
– सीबीजी, इथेनॉल, मल्टी-फीड डिस्टिलरी, शाश्वत विमान इंधन निर्मितीला प्रोत्साहन
– सहवीज निर्मिती, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जैव-रसायन निर्मितीवर भर
– १० उपपदार्थांच्या निर्मितीसाठी एकात्मिक बायो-रिफायनरी अर्थात झिरो वेस्ट मॉडेल तयार करण्याचा विचार
– यासाठी केंद्र सरकार २० टक्के, राज्य सरकार १० टक्के आणि कारखान्यांचा ७० टक्के आर्थिक सहभाग या प्रस्तावित आर्थिक प्रारूपाची व्यवहार्यता तपासली जाणार
अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना पुनरुज्जीवनाचा आधार
– प्रत्येक कारखान्याची स्वतंत्र आर्थिक व्यवहार्यता तपासली जाणार
– हंगामनिहाय स्वतंत्र कॅश क्रेडिट कर्ज खाते आणि कर्ज परतफेडीचे धोरण निश्चित होणार
– आर्थिक अडचणीत असलेल्या एनपीए कारखान्यांसाठी रिझर्व्ह बँकेच्या मदतीने पुनरुज्जीवन आणि कर्जनिराकरण आराखडा तयार होणार
– बाह्य गुंतवणूकदारांचा सहभाग, पुनरुज्जीवन निधी आणि एनसीडीसीमार्फत भांडवली सहाय्याबाबत धोरण निश्चित करण्याचा अभ्यास