पेपरफुटीनंतर अखेर जाग, आता सर्व परीक्षा MKCL, IBPS, आणि TCS घेणार, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

| Updated on: Dec 15, 2021 | 7:49 PM

अलिकडेच म्हाडाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीनंतर राज्य सराकारला अखेर जाग आली आहे. राज्य सरकारच्या सर्व परीक्षा आता MKCL, IBPS, आणि TCS घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

पेपरफुटीनंतर अखेर जाग, आता सर्व परीक्षा MKCL, IBPS, आणि TCS घेणार, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
mantralaya
Follow us on

मुंबई : आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलीय. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातच अलिकडेच म्हाडाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीनंतर राज्य सराकारला अखेर जाग आली आहे. राज्य सरकारच्या सर्व परीक्षा आता MKCL, IBPS, आणि TCS घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

म्हाडाच्या पेपरफुटीनंतर राज्य सरकारचा निर्णय

अलिकडेच झालेल्या पेपरफुटीमुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला होता. या पेपरफुटीनंतर राज्य सरकारवर म्हाडाच्या परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. या पेपरफुटीच्या प्रकरणात राज्य सरकारकडून काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. या पेपटफुटीची सध्या चौकशी सुरू आहे. यात आणखी काही महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. यात पोलिसांनी काही संभाषणेही तपासली आहेत.

याआधीही पेपरफुटीच्या घटना

याआधीही अनेक पेपटफुटीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अनेक विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याचेही आपण पाहिले होते. त्यानंतर आरोग्य विभागाचे पेपर फुटल्याने कित्येक वेळा परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. पेपटफुटीच्या घटनांमुळे अनेकदा परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड नुकसानाला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने, आज अखेर राज्य शासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर इथून पुढे सर्व परीक्षा MKCL, IBPS, आणि TCS घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आत्महत्या केल्यानंतरही एमपीएसीच्या मुलाखतीच्या यादीत स्वप्निल लोणकरचे नाव आल्यानंतर आधीच विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यात तरी विद्यार्थ्यांना पेपरफुटीच्या त्रासाला सामोरे जायला लागू नये हीच अपेक्षा.

YouTube लोगोऐवजी 1 लाख कोटी हा आकडा दिसतोय? जाणून घ्या त्यामागचं कारण

विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानेच होणार, नियम समितीच्या बैठकीत निर्णय

Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर, दौऱ्यात कोणती मोठी घोषणा?