Solapur : स्टिंग ऑपरेशननं उघड केलं सोलापूर पोलिसांचं वसुलीचं टार्गेट
सोलापूर (Solapur) शहर पोलीस (Police) आयुक्तालयातील क्राइम ब्रांचकडून महिन्याकाठी 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याची माहिती एका स्टिंग ऑपरेशनमुळे (Sting operation) समोर आलीय.
सोलापूर (Solapur) शहर पोलीस (Police) आयुक्तालयातील क्राइम ब्रांचकडून महिन्याकाठी 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याची माहिती एका स्टिंग ऑपरेशनमुळे (Sting operation) समोर आलीय. याबाबतची रितसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गृह विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस आयुक्तालयातून सुरू असलेल्या या वसुलीविषयी अँटी करप्शनला तक्रार केली तर त्यांच्याकडून ही पोलीस आयुक्तालायला मदत होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी केलाय. या स्टिंग ऑपरेशन मधील संवाद हा पोलीस कर्मचारी आणि पत्ते क्लब चालवाणाऱ्या व्यक्तीमधील आहे. दरम्यान, सोलापूर पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी याबाबत चौकशी समिती नेमली जाणार आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

